घरCORONA UPDATEGoodNews! Covaxin ची माकडांवर चाचणी यशस्वी; भारत बायोटेक कंपनीला यश

GoodNews! Covaxin ची माकडांवर चाचणी यशस्वी; भारत बायोटेक कंपनीला यश

Subscribe

येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होणार

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून कोरोनावरील लस बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, मेड इन इंडिया असलेल्या भारत बायोटेक कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे Covaxin ची माकडांवर चाचणी यशस्वी झाली. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

- Advertisement -

 

भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माकडांवर करण्यात आलेल्या चाचणीनंतर त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली आहे. भारत बायोटेकने मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर ही चाचणी केली. पहिल्या टप्प्यातील कोरोनाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी भारत बायोटेक कंपनीने DCGI कडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक कंपनीने १२ हरांमध्ये कोरोना लसीची चाचणी केली. त्यामध्ये ३७५ लोकांनी सहभाग घेतला होता. तसेच भारतात आतापर्यंत तीन लसींवर सध्या काम सुरू असून सीरम इंन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांच्या भागीदारीतून तयार करण्यात येणाऱ्या लसीची मानवी चाचणी देखील भारतात सुरू आहे.

एका अहवालानुसार, भारत बायोटेक कंपनीने DCGI ला मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला परवानगी देण्यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. DGCI च्या डॉक्टर एस. एश्वर्या रेड्डी यांनी ३८० लोकांवर ही चाचणी करण्यासंदर्भात योजना सुचवली आहे. तीन चाचण्यांपैकी पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.


Corona Vaccine: वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवा, DCGI चा सीरम इन्स्टिट्यूटला आदेश
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -