घरताज्या घडामोडीदिलासादायक! देशात रिकव्हरी रेट वाढला; ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक! देशात रिकव्हरी रेट वाढला; ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

भारतात सध्या ११ लाख कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासांत भारतात ३६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले असून कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब देखील समोर आली आहे, ती म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असून भारतात सध्या ११ लाख कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासांत भारतात ३६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले असून कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच रिकव्हरी रेट आता ६४.५३ टक्के इतका झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-रिकव्हरी रेट ६४. ५३ टक्के इतका झाला आहे. तर सुरुवातीच्या काळात भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर घेण्यात आलेल्या ल़कडाऊन दरम्यान देशात रिकव्हरी रेट हा सर्वात कमी म्हणजे २.१५ टक्के होता. मात्र, आता जून महिन्याच्या दरम्यान हा रिकव्हरी रेट ३.३३ टक्के झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – देशात गेल्या २४ तासांत ५७,११७ नवे रूग्ण; ७६४ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -