दिलासादायक! २४ तासात देशातील कोरोना रूग्णांच्या वाढीत घसरण

देशात गेल्या २४ तासात ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ४३ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर २४ तासात १ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल देशात कोरोनाबाधितांच्या यादीत भारताने ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासात आढळून आलेल्या रुग्णांची व मृतांची माहिती जाहीर केली. मंत्रालयानं दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासात देशात ७५ हजार ८०९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या ४२ लाख ८० हजार ४२३ वर पोहोचली आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत दुसऱ्यास्थानी पोहोचला असून, भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे. आतापर्यंत ७३ हजार ५२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.