घरCORONA UPDATEजास्तीत जास्त कोरोना चाचणी करा, उपचार करा, हा आपला मंत्र असला पाहिजे...

जास्तीत जास्त कोरोना चाचणी करा, उपचार करा, हा आपला मंत्र असला पाहिजे – प्रियांका गांधी

Subscribe

प्रियांका गांधी यांनी आज ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सरकारला कोरोना चाचणी करण्याची संख्या वाढवा अशी मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना करत देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान कोरोना चाचणी इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी होत असल्यामुळे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नंतर सोमवारी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारला आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्ग रोखण्यासाठी एक मार्ग आहे तो म्हणजे जास्ती जास्त कोरोना चाचणी करने. तरच आपण संक्रमित झालेल्या व्यक्तीवर उपचार करू शकतो. शक्य तितक्या जास्तीत जास्त कोरोनाची चाचणी करा, उपचार करा, हा आपला मंत्र असला पाहिजे. जास्त चाचणी होण्यासाठी आवाज उठावा, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. #TestMoreSaveIndia

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये प्रियांका गांधींनी सांगितलं की, आपण लॉकडाऊनच्या दुसऱ्या फेज मध्ये पोहोचत आहोत, अशा परिस्थिती कोरोना व्हायरसच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. ज्यामुळे आम्हाला संक्रमित झालेल्या लोकांची संख्या जाणून घेण्यास मदत होते. जेणेकरून आपण त्यावर उपचार करू शकू. याशिवाय प्रियांका गांधी या व्हिडिओमध्ये साऊथ कोरिया आणि इटलीचे उदाहरण दिले आहे. येथील कोरोना चाचण्यांच्या संख्येत खूप मोठा फरक आहे.

- Advertisement -

पुढील दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आपले डॉक्टर्स आणि नर्सेस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कारण आपल्यात एक टक्का लोकही गमावण्याची हिम्मत नाही आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रियांका गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस होत आहे.


हेही वाचा – टाळ्यांनी आणि दिव्यांनी कोरोनाची समस्या सुटणार नाही – राहुल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -