Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates: लोकलचा निर्णय पुढच्या आठवड्यात?

Live Updates: लोकलचा निर्णय पुढच्या आठवड्यात?

Related Story

- Advertisement -

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाचा निर्णय पुढच्या आठवड्यात होण्यात शक्यता आहे. पुढील आठवड्यात मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे, अशी हायकोर्टात माहिती दिली आहे.


मुंबईत मागील २४ तासांत ६५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात ४७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ९७ हजार ६३८वर पोहोचला आहे. यापैकी ११ हजार १७१ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ७७ हजार ६६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ६९३ नवे रुग्ण आढळले असून २ हजार ८९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात ७३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील आता कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ६१ हजार ९७५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ लाख ५८ हजार ९९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या राज्यात ४९ हजार ९७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


रायगड जिल्ह्यात कुडपान येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. ३०० फूट दरीत वऱ्हाडाचा ट्रक कोसळल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहित मिळत आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. फडवणीसांसोबत चंद्रकांत पाटीलही दिल्लीत पोहोचले आहे. वरिष्ठ नेत्यांशी फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत.


शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा नाही. १५ जानेवारीला होणार पुढील बैठक.


माढा तालुक्यातील बारालोणी येथे आरोपी पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करीत २५ ते ३० लोकांनी आरोपीला सोडवून नेलं. १०० पोलिसांचा फौज फाटा घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे बारलोणीकडे रवाना झाले होते. शंकर गुंजाळ नावाच्या कुख्यात आरोपीला गावातील काही लोकांनी सोडवून नेलं आहे.


९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची घोषणा करम्यात आली आहे. नाशिकमध्ये यंदाचे साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकरव ठाले पाटील यांनी घोषणा केली.


राज्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन पार पडणार आहे. कोरोना लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज (शुक्रवारी) देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन पार पडणार आहे.


अहमदनगर जिल्हयात अवकाळी पाऊस पडला आहे. रात्रीपासून रिमझीम पाऊस पडत असून सकाळपासुन ढगाळ वातावरण आहे. अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाने गहु, कांदा, हरबरा, द्राक्ष आदी पिकांचं नुकसान होणार आहे.


शिवसेनेचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते महेश कोठे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असून त्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. महेश कोठेंबरोबर अनेक कार्यकर्तेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

- Advertisement -