Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: 'हा तर असभ्य वर्तनाचा कळस, वर्णद्वेषी टिपण्णी खपवून घेतली जाणार...

Live Update: ‘हा तर असभ्य वर्तनाचा कळस, वर्णद्वेषी टिपण्णी खपवून घेतली जाणार नाही’

Related Story

- Advertisement -

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय खेळांडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिपण्णीचा सामना करावा लागला. याप्रकरणी सर्वच स्तरातून टीका होत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा तर असभ्य वर्तनाचा कळस असून वर्णद्वेषी टिपण्णी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत त्याने आपला राग व्यक्त केला.


- Advertisement -

गोळीबार करून ज्वेलर्स दुकानावर दरोडा; ३० तोळ्यांची लूट, ३ जण जखमी

अंबरनाथ सर्वोदय मार्केटमध्ये असलेल्या भवानी ज्वेलर्समध्ये भरदिवसा दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार दरोडेखोरानी गोळीबार करून दरोडा टाकून पळ काढल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या दरोड्यात २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे. बोईसर, मिरारोड,अंबरनाथ येथे एकापाठोपाठ एक, असे तीन ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्यामुळे ज्वेलर्स दुकानदारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


- Advertisement -

मिशन बिगीन अगेनच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे दररोज कोरोनाचे नवे रुग्ण देखील सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासमोरचं आव्हान कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज राज्यात तब्बल ३ हजार ५५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ६९ हजार ११४ इतका झाला आहे. यापैकी ५४ हजार १७९ अॅक्टिव्ह रुग्ण असून आज २ हजार ३०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज दिवसभरात राज्यात ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदूर २.५४ टक्के एवढा झाला आहे.


मराठा आरक्षणासंदर्भात नवी दिल्लीत बैठक

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी, सोमवारी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.


ब्रिटनहून भारतात आलेल्या ९० प्रवाशांमध्ये नवीन कोरोना व्हायरस आढळला आहे.


९ जानेवारीपर्यंत देशात १८ कोटी १० लाख ९६ हजार ६२२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी ८ लाख ४३ हजार ३०७ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


देशात २४ तासांत आढळले १८, ६४५ नवे रुग्ण, २०१ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ४ लाख ५० हजार २८४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५० हजार ९९९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७५ हजार ९५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २ कोटी २३ हजार ३३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार असून बालक गमावलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.


जगातील कोरोनाबाधितांची संख्या ९ कोटी पार!

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनने थैमान घातले आहेत. तसेच अनेक देशांमध्ये हा नवा कोरोना स्ट्रेन पसरला आहे. त्यामुळे सध्या जगातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ९ कोटी ७७ हजार ४४६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १९ लाख ३४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ६ कोटी ४४ लाख ६३ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -