घरदेश-विदेशबंगळुरुत काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्फोट; पादचाऱ्याचा मृत्यू

बंगळुरुत काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्फोट; पादचाऱ्याचा मृत्यू

Subscribe

बंगळुरुमधील काँग्रेस आमदार मुनीरथना यांच्या घराबाहेर स्फोट झाला असून या स्फोटामध्ये एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

बंगळुरुमधील काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर रविवारी सकाळी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. स्फोट घडला की घडवला? तसेच हा नेमका स्फोट कशाचा झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार, आमदार मुनीरथना यांचे राजेश्वरी नगर येथील घराजवळ रविवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी स्फोट झाला. या स्फोटामध्ये त्यावेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. व्यंकटेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -