प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आले होते

Saumitra_Das

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रविवारी दुपारी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौमित्र चटर्जी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर योग्य उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर कोविड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.