लोकसभेचा अंतिम निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत लागण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी शुक्रवारची पाहाट उजाडण्याची शक्यता आहे. यावर्षी ईव्हीएम मशीन्ससोबत व्हीव्हीपॅट स्लिपमधील देखील मतांची मोजनी होणार आहे. त्यामुळे मतमोजनीला उशिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai
final results of the Lok Sabha are expected to be held till Friday morning
लोकसभेचा अंतिम निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत लागण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्याचे मतदान पार पडले आहे. आता देशभरातील नागरिकांना निकालाची उत्सूकता लागलेली आहे. निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी अर्थात गुरुवारी जाहीर होणार आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजनीला सुरुवात होणार आहे. देशभरातील ५४३ जागांची मतमोजनी गुरुवारी केली जाणार आहे. यावर्षी झालेल्या निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅटचा देखील वापर केला गेला आहे. त्यामुळे मतमोजनी दिवसभर सुरु राहील. याशिवाय, या निवडणुकीचा अंतिम निकालासाठी शुक्रवारची पाहाट उजाडण्याची शक्यता आहे.

प्रत्येक विधानसभातील मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजनीला सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजनी होईल. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएममधील मतांची मोजनी होईल. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधील पाच व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतांची पडताळणी केली जाईल. ईव्हीएम मशीनच्या मतमोजनी नंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाईल. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास वेळ लागू शकतो.

व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणीनंतरच अंतिम निर्णय

व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणीनंतरच अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. याशिवाय प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कोण आघाडीवर किंवा कोण पिछाडीवर हे कळू शकेल. अंतिम निकाल हा कदाचित संध्याकाळी ७ ते सकाळपर्यंत लागू शकतो.