फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजमुळे ७०,००० रोजगार

Flipkart-Big-Billion-Days-sale
Advertisement

ई-कॉमर्स बाजारपेठत आपल्या बिग बिलियन डेजच्या (बीबीडी) माध्यमातून ७०,००० हून अधिक प्रत्यक्ष आणि लाखो हंगामी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्यास मदत करणार आहे अशी घोषणा फ्लिपकार्टमार्फत करण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या सप्लाय चैनच्या सर्व टप्प्यांवर थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि सॉर्टर्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्टच्या विक्रेते भागिदारांच्या ठिकाणी आणि किराणा दुकानांमध्ये अतिरिक्त अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले जातील असे फ्लिपकार्टने जाहीर केले आहे.

भारतात आगामी सणांचा कालावधी पाहता सगळा ई-कॉमर्स व्यवसाय उत्सवकाळासाठी सज्ज होत आहे. विक्रेत्यांची ठिकाणे आणि वाहतूक भागीदारांच्या पूरक उद्योगांतही रोजगारनिर्मिती केली जाईल. उत्सवपर्वासाठी या व्यवसायातील लाखो घटक सज्ज होत असताना पुरवठा साखळीचा विस्तार आणि सशक्तीकरण यांच्यातून ई-कॉमर्सच्या नव्या दशलक्षावधी वापरकर्त्यांना ऑनलाइन खरेदीचा अनुभव देण्यासाठी एक मजबूत व्यवस्था तयार होईल असे फ्लिपकार्टला वाटते.

बिग बिलियन डेजची गुंतागुंत आणि भव्यता लक्षात घेता त्यात क्षमता, साठवणूक, छाननी, पॅकेजिंग, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि वितरण यांच्यात मोठ्या गुंतवणुकीची गरज पडते. त्यातून उत्सवपर्वात अतिरिक्त रोजगाराची निर्मिती होते. या वर्षी फ्लिपकार्ट पुरवठासाखळीत जवळपास ७०,००० जणांना रोजगार देणार असून त्याचबरोबर विक्रेते आणि व्यवसायातील अन्य भागीदारांच्या कामकाजाच्या ठिकाणी लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणार आहे. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्यासाठी ५०,०००हून अधिक किराणा दुकानांना सोबत घेतल्यामुळे या उत्सवकाळात लक्षावधी पॅकेजेसची डिलिव्हरी करण्यासाठी हजारो हंगामी रोजगार तयार होतील.

“आमचे ग्राहक आणि व्यवसायातील भागीदार यांच्या आयुष्यातील उत्सवांचे महत्त्व आम्ही जाणतो. ही संपूर्ण परिसंस्था बिग बिलियन डेजसाठी (बीबीडी) सज्ज होत असताना आम्ही या परिसंस्थेच्या विकासासाठी अतिरिक्त संधी निर्माण करताना ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव देणाऱ्या प्रभावशाली भागीदाऱ्या निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.रोजगारनिर्मिती करून आणि आमच्या विक्रेत्यांना या काळात व्यवसायवृद्धीची संधी निर्माण करून आम्ही या उद्योगाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावत आहोत, असे फ्लिपकार्टच्या ईकार्ट आणि मार्केटप्लेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमितेश झा म्हणाले.