घरदेश-विदेश'या' क्रिकेटपटूची मुजोरी बघा; दारुच्या नशेत केली मारहाण

‘या’ क्रिकेटपटूची मुजोरी बघा; दारुच्या नशेत केली मारहाण

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमारने दारुच्या नशेत एका लहान मुलाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत लहान मुलाचा बोट फ्रॅक्टर झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी प्रवीण कुमारच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

प्रवीण कुमार आपल्या गाडीने मेरठमधील बागपत रोडवरील मुलतानगर येथून आपल्या गाडीने जात होता. त्यावेळी रस्त्यामध्येच एक स्कूल बस उभी होती. यावेळी दीपक शर्मा नावाची व्यक्ती आपल्या मुलासोबत स्कूल बस जवळ उभी होती. प्रवीण कुमारने पुढे उभ्या असलेल्या स्कूल बसला बाजूला करण्यासाठी मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. मात्र, बस बाजूला होत नसल्याचे पाहताच प्रवीणला चांगलाच संताप आला. तो गाडीखाली उतरला आणि बस जवळ गेला. तिथे उभ्या असलेल्या दीपक शर्मा यांना त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी दीपक शर्मा आणि प्रवीण कुमार यांच्यात बाचाबाची झाली. शर्मा यांचा सात वर्षाचा मुलगा जेव्हा मध्ये आला तेव्हा प्रवीण कुमारने त्याला जोरात धक्का दिला आणि मुलगा खाली पडला. यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली.

- Advertisement -

हा सर्व प्रकार घडत असताना घटनास्थळी मोठी गर्दी निर्माण झाली. प्रवीण कुमार हा दारुच्या नशेत गोंधळ घालत आहे, हे लक्षात येताच लोकांनी प्रवीण कुमारला विरोध करायला सुरुवात केली. लोकांकडून होणारा विरोध पाहता प्रवीण कुमारने तेथून धूम ठोकली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाली. मुलाला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासानंतर मुलाचा बोट फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी प्रवीण कुमारच्या विरोधात तक्रार दाखल केली.


हेही वाचा – फास्टॅग अजून मिळवलं नाही? काळजी करु नका १ महिन्याचा वेळ आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -