घरदेश-विदेश'व्हिडिओ गेम अॅडिक्शन' मानसिक आजारच!

‘व्हिडिओ गेम अॅडिक्शन’ मानसिक आजारच!

Subscribe

व्हिडिओ गेम अॅडिक्शनला आता मानसिक आजार म्हणून घोषित

उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतरही मुलं व्हिडिओ गेम सोडायला तयार होत नाहीत. सतत व्हिडिओ गेम खेळून त्यांच्यात खेळायची आवड निर्माण होते. नकळत ही आवड सवयीमध्ये बदलते अशा मुलांना ‘व्हिडिओ गेम अॅडिक्ट’ म्हटले जाते. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूटीओ) व्हिडिओ गेम अॅडिक्शन आता मानसिक आजार असल्याचे जाहीर केले आहे. डब्ल्यूटीओच्या या निर्णयामुळे व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. आयसीडी म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आजार वर्गीकरण यादीत आता व्हिडिओ गेम अॅडिक्शन हा एक मानसिक आजार म्हणून गृहित धरण्यात आला आहे.

डब्ल्यूटीओने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगात २.६ अब्ज लोक नियमित व्हिडिओ गेम खेळतात, असे दिसून आले आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. याचा फायदा गेमिंग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर होतो. गेमिंग इंडस्ट्रीचा नफा दरवर्षी ३१ टक्क्यांनी वाढत आहे. मुलांना गेमिंग अॅडिक्शन पासून दूर करण्यासाठी ब्रिटनमधील मुलांना मोफत उपचार दिले जातात. येथील मुलांना मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन गेम खेळण्याची सवय असल्याने मैदानी खेळ खेळण्यावर जास्त भर दिला जात आहे.

- Advertisement -

आजाराची लक्षणे

⦁ बाहेरुन आल्यावर किंवा घरी बसलेले असल्यास गेम खेळण्याची इच्छा होणे
⦁ ठराविक वेळेनंतर गेम न खेळल्यास खेळायची इच्छा निर्माण होणे
⦁ दैनंदिन काम करण्याऐवजी व्हिडिओ गेम खेळणे अधिक महत्वाचे वाटणे
⦁ रेकॉर्ड बनवण्यासाठी तासनतास सातत्याने गेम खेळत राहणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -