जीव द्यायची इच्छा व्यक्त केली, अन् ‘मोमो’चा मेसेज आला

पीडित विद्यार्थिनीला व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला, ज्यामध्ये त्या व्यक्तीने या मुलीला 'मोमो चॅलेंज' खेळण्याचं आव्हान दिलं होतं.

Mumbai
momo death
सौजन्य- metro.co.uk

सध्या जगभरात एक भयानक गेम सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या गेमचं नाव आहे ‘मोमो’.  ‘मोमो व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज’ असं एक चॅलेंज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या धक्कायदायक माहितीनुसार हे ‘मोमो’ व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. दरम्यान पश्मिम बंगालमध्ये या मोमो गेम विरोधात लेखी तक्रार नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगलमधील जलपाईगुडी इथल्या या एका कॉलेज विद्यार्थिनीने ही मोमो विरोधातील तक्रार नोंदवल्याचं समजतं आहे. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, तिचं आणि तिच्या आईचं भांडण झाल्यामुळे सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘मला जीव द्यावासा वाटतो आहे,’ असा संदेश लिहीला होता. दरम्यान विद्यार्थिनीने सांगितल्यानुसार, ही पोस्ट सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर काही वेळातच तिला व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला, ज्यामध्ये त्या व्यक्तीने या मुलीला ‘मोमो चॅलेंज’ खेळण्याचं आव्हान दिलं. दरम्यान पीडित विद्यार्थिने याचसंदर्भातील सविस्तर लेखी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. कोलकता पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरु केल्याचं समजत आहे.

हेही वाचा : अजमेरमध्ये ‘मोमो’ने घेतला लहान मुलीचा बळी?

काय आहे MOMO गेम ?

उपलब्ध माहितीनुसार, सुरुवातीला तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एक नंबर येतो. हा नंबर ‘मोमो’ या नावाने सेव्ह केलेला असतो आणि त्यावर एका विचित्र चेहऱ्याच्या बाईचा फोटो असतो. इतकंच नाही तर त्याखाली ‘कॉन्टॅक्ट मी’ असा मेसेजही लिहीलेला असतो. अनेक लोक उत्सुकतेपोटी हा नंबर सेव्ह करतात आणि तिथूनच या खेळाला सुरुवात होते. आतापर्यंत समोर आलेल्या अहवालानुसार बऱ्याच लोकांनी या मोमोचा नंबर सेव्ह करुन तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञ सांगतात की, या नंबरवरुन तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधता, ती व्यक्ती सुरुवातीला तुमच्या मनामध्ये भीती भरवते. आयुष्यातील अडचणी, संकटं यांची भीती दाखवत कॉल करणाऱ्याला घाबरवून टाकते, निराश करते. त्यानंतर एकप्रकारे हिप्नोटाईज करुन कॉलरला आत्महत्येकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो.

एक नजर टाका या व्हिडिओवर:

सौजन्य- युट्यूब