घरदेश-विदेशफी न भरल्यामुळे शाळेने ५९ विद्यार्थिनींना ५ तास कोंडून ठेवले

फी न भरल्यामुळे शाळेने ५९ विद्यार्थिनींना ५ तास कोंडून ठेवले

Subscribe

फी न भरल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेच्या इमारतीमधील बेसमेंटमध्ये कोंडून ठेवले. दिल्लीच्या राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास ५ तास या मुलींना कोंडून ठेवण्यात आले होते. ही घटना उघड झाल्यानंतर संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल केली.

शाळेमध्ये फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेकडून शिक्षा दिली जाते हे तर आपल्याला माहित आहे. काही वेळी त्यांना वर्गामध्ये उभे केले जाते, त्यांचा सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमान केला जातो, घरी पाठवले जाते, वर्गाबाहेर उभे केले जाते तसंच फटके देखील दिले जातात असे आपण ऐकले आहे. मात्र फी न भरल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेतील एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याची घटना कधी ऐकली नसेल. परंतू असा प्रकार घडलाय तो सुध्दा राजधानी दिल्लीमध्ये.

फी न भरल्याने केली शिक्षा

दिल्लीतील बल्लीमारान येथे असणाऱ्या राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. शाळेची फी न भरल्यामुळे ५ ते ८ वर्षाच्या ५९ मुलींना शाळेच्या बेसमेंटमध्ये बंद करण्यात आले होते. सोमवारी ही घटना घडली असून तब्बल ५ तास या मुलींना या खोलीमध्ये बंद करुन ठेवण्यात आले होते. विद्यार्थिनींचे पालक जेव्हा त्यांना घेण्यासाठी दुपारी १२.३० वाजता शाळेमध्ये आले तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

- Advertisement -

मुख्याध्यापिकांच्या सांगण्यावरुन केली शिक्षा

संतप्त पालकांनी शाळेच्या शिक्षकांकडे यासंदर्भात विचारपूस केल्यानंतर या मुलींनी फी न भरल्यामुळे त्यांना शिक्षा केल्याचे समोर आले. त्यांना शाळेच्या बेसमेंटमध्ये असणाऱ्या एका खोलीमध्ये बंद करण्यात आले. या शाळेच्या मुख्याध्यापिका फराह दीबा खान यांच्या सांगण्यावरुन या मुलींना त्या खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

मुलींना टॉयलेटला सुध्दा जाऊन दिले नाही

शिक्षा करण्यात आलेल्या विद्यार्थिनींना बेसमेंटमध्ये तब्बल ५ तास जमीनीवर बसवण्यात आले होते. त्याठिकाणी पंखा पण नव्हता त्यामुळे गरम खूप होत होते. या मुलींना पाणी आणि जेवण देखील देण्यात आले नव्हते. तसंच त्यांना टॉयलेटला सुध्दा जाऊन दिले नाही. हे चित्र जेव्हा पालकांनी पाहिले तेव्हा ते संतप्त झाले. आणि त्यांनी थेट मुख्याध्यापिकांकडे जाब विचारला. तर मुख्याध्यापिकांनी या पालकांना शाळेबाहेर काढण्याची धमकी दिली.

- Advertisement -

शाळेविरोधात तक्रार दाखल

दरम्यान या विद्यार्थिनींमधील काही विद्यार्थिनींच्या पालकांनी फी भरली असल्याचे सांगितले. फी भरल्याचा चेक त्यांनी मीडियासमोर दाखवला. दरम्यान स्कूल प्रशासनाने यासंदर्भातील आरोप फेटाळले. या मुलींना बेसमेंटमधील ज्या खोलीमध्ये बसवले होते त्याठिकाणी फॅन आणि लाईटची व्यवस्था होती. तसंच तो एक्टिव्हिटी रुम असल्याचे स्कूल प्रशासनाने सांगितले. याप्रकरणी संतप्त पालकांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

विद्यार्थिनींचा शाळेत जाण्यास नकार

या घटनेनंतर या विद्यार्थीनी घाबरल्या आहेत. ते शाळेमध्ये जाण्यास नकार देत असल्याचे काही विद्यार्थिनींच्या पालकांनी सांगितले. फी द्यायला उशीर झाल्याने कोणती शाळा ५ वर्षाच्या मुलींना अशाप्रकारची शिक्षा देते का? असा सवाल काही पालकांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -