२५० भारतीयांची बहरीनच्या तुरुंगवासातून सुटका होणार

फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनला भेट दिली. त्यानंतर बहरीन सरकारने तेथील २५० भारतीय कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

New Delhi
Modi-in-Bahrain
२५० भारतीयांची बहरीनच्या तुरुंगवासातून सुटका होणार

बहरीनमध्ये कारागृहाची शिक्षा भोगत असलेल्या २५० भारतीयांची सुटका करण्याचा निर्णय बहरीन सरकारने घेतला आहे. या कैद्यांना बहरीन सरकारकडून माफी देण्यात येणार आहे. मानवतेच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर बहरीन सरकारने भारतीय कैद्यांची सुटका करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. बहरीन सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे बहरीन सरकारचे आभार मानले आहेत.

 काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन बहरीन सरकारच्या या निर्णयाबद्दल माहिती दिली. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ”दया आणि मानवतेच्या भावनेने बहरीन सरकारने तेथे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या २५० भारतीयांना माफी दिली आहे. त्यामुळे बहरीनमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नागरिकांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे.” बहरीन सरकारच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आभार व्यक्त केले आहेत. या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, ”बहरीनच्या शाह आणि त्यांच्या शाही कुटुंबाचे या निर्णयाचे स्वागत आणि त्यांचे आभार.”

 हेही वाचा – Video : राहुल गांधींना पाहताच कश्मीरी महिलेने फोडला हंबरडा

‘द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ’ पुरस्काराने पंतप्रधानांचा सन्मान

फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी बहरीनला भेट दिली. या ठिकाणी त्यांना ‘द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचे शाह हमाद बिन इसा अल खलिफा यांच्यासोबत विविध प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा केली.