अर्थव्यवस्थेचे वाईट दिवस संपणार, डिसेंबरमध्ये येणार ‘अच्छे दिन’ – केकी मिस्त्री

hdfc ceo says the bad phase of economy is over, good days will come in December

एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल मोठं विधान केलं आहे. अर्थव्यवस्थेचा वाईट काळ लवकरच संपणार असल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं. आर्थिक पुनर्प्राप्तीचा वेग अपेक्षेपेक्षा वेगवान आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येणार असल्याचं मिस्त्री म्हणाले.

अर्थव्यवस्थे संदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारसाठी दिलासा मिळाला आहे. अनेक आकडेवारी जाहीर करण्यात आली असून त्यात अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याची चिन्हे आहेत. आता एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. केकी मिस्त्री म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ मागे पडत आहे आणि आर्थिक पुनर्प्राप्तीचा वेग पेक्षेपेक्षा वेगवान आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबरच्या तिमाहीत वाढीचा दर चांगला असू शकतो, असं मिस्त्री म्हणाले.

भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ६ महिन्यांत आपली लवचिकता सिद्ध केली आहे. गृह कर्ज व्यवसाय करणाऱ्या एचडीएफसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी शनिवारी अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेतर्फे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ही माहिती दिली. केकी मिस्त्री म्हणाले की अनुकूल व्याजदराचा टप्पा अजून पुढे सुरू राहील आणि आर्थिक हालचालींचा वेग वाढल्यानंतर आणि महागाईचा दबाव वाढल्यानंतरच हे दर वाढतील. तथापि, ते म्हणाले की, व्याज दर सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत.

रोजगार निर्मितीची क्षेत्रे ओळखणं आवश्यक

या कार्यक्रमात केकी मिस्त्री म्हणाले की, आता सरकारने सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारे क्षेत्र ओळखले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत. ते म्हणाले की, शेतीनंतर रिअल इस्टेट आणि स्थावर मालमत्ता व्यवसायात रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रावर लक्ष देण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त केकी मिस्त्री यांनी उत्पादन क्षेत्राला पाठिंबा देण्याची गरजही व्यक्त केली. ते म्हणाले की ज्या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार आहेत त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. डिसेंबर तिमाहीचा निकाल चांगला असू शकेल.


हेही वाचा – देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात