घरदेश-विदेशहिमाचलमध्ये इमारत कोसळून २ जण ठार; अनेक जण अडकल्याची भिती

हिमाचलमध्ये इमारत कोसळून २ जण ठार; अनेक जण अडकल्याची भिती

Subscribe

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील कुमारहट्टी भागात एका गेस्ट हाऊसची इमारत कोसळली असून या दुर्घटनेत सैनिकांसह ३५ जण अडकले असल्याची माहिती समोर आले आहे. तर आतापर्यंत दोन जाणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील कुमारहट्टी भागात एका गेस्ट हाऊसची इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये लष्कराच्याही अनेक जवानांचा समावेश आहे. तर आतापर्यंत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या याठिकाणी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. बचावकार्य सुरु असून संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहे.

- Advertisement -

१४ जण ढिगाऱ्याखाली अडकले

सोलन जिल्ह्यातील कुमारहट्टी भागात एका गेस्ट हाऊसची इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेट रस्त्यावरून जात असलेले सैन्याचे जवान येथे जेवणासाठी थांबले होते, त्याच दरम्यान हा अपघात घडला आहे. या सैनिकांसोबत त्यांचे कुटुंबीयदेखील त्याठिकाणी होते. सध्या बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत २३ जणांची सुटका करण्यात आली आहे. यात १८ सैनिक आणि पाच नागरिकांचा समावेश आहे. अद्यापही १४ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -