घरCORONA UPDATEभारतात App वर बंदी आणल्यानंतर चीन चिंतेत; परराष्ट्र मंत्रालयातून आली प्रतिक्रिया

भारतात App वर बंदी आणल्यानंतर चीन चिंतेत; परराष्ट्र मंत्रालयातून आली प्रतिक्रिया

Subscribe

भारताने काल ५९ चीनी अॅपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज हे सर्व अॅप गुगल स्टोअरमधून हळूहळू बाहेर पडू लागले. या सर्व घटनेवर आता चीनमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारताच्या या निर्णयामुळे चीन चिंतेत आल्याचे पाहायला मिळत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या सर्व प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे म्हटले आहे. प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले की, चीनच्या सरकारने नेहमीच चीनमधील व्यवसाय आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळवरील कायद्याच्या चौकटीत राहून केला आहे.

हेही वाचा – व्हायरस चीनला सोडेना; आता सापडला नवा विषाणू!

- Advertisement -

या ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी 

या मोबाईल अ‍ॅपमध्ये टीक-टॉक, युसी ब्राऊसर यांच्यासह इतर चिनी अ‍ॅप आहेत. हे अ‍ॅप देशाची सुरक्षा, अखंडता आणि स्वायत्तबाबत पूर्वग्रहदुषित असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. या अ‍ॅपमध्ये शेअर इट, क्वाई, बलदू मॅप, शेइन,क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लाईकी, यु कॅन मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊसर, व्हायरस क्लिनर, एप्लस ब्राऊसर, रोमवे, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्युटी प्लस, वूई चॅट, युसी न्यूजस, क्यूक्यू मॅल, वेबो, झेंंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाईव्ह, सेल्फीसिटी, मी व्हिडिओ कॉल-झाओमी, वूईसिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, विवा व्हिडिओ, मेईटू, विगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयु रेकॉर्डर, वॉल्ट-हाईड, कॅचे क्लिनर, डीयु क्लिनर, डीयु ब्राऊसर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, वूई मीट, स्वीट सेल्फी, बाईदु ट्रान्स्लेट, वीमेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सेक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लाँचर, यु व्हिडिओ, वी फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लिजंड, डीयु प्रायव्हसी या अ‍ॅपचा समावेश आहे.

हेही वाचा –

पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय! २४ तासांत ८३३ रुग्णांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -