घरट्रेंडिंग'मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान',शहीद कर्नल यांच्या आईची प्रतिक्रीया!

‘मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान’,शहीद कर्नल यांच्या आईची प्रतिक्रीया!

Subscribe

भारत- चीन सीमेवर काल रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान २० सैनिक शहीद झाले तर ANI ने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान ४३  सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. चीनबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत शहीद कर्नल संतोष बाबू यांचे पार्थिव आज हैदराबादला पोहचेल. सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद कर्नलची पत्नी आणि मुले अद्याप दिल्लीत आहेत, जे थोड्याच वेळात हैदराबादला रवाना होतील. बाकीचे कुटुंब हैदराबादमध्ये आहे.

शहीद कर्नल संतोष बाबूचे वडील बी उपेंद्र यांनी सांगितले की ते फक्त ३७ वर्षांचे आहेत आणि त्यांच्यासमोर सुवर्ण भविष्य आहे. वडील म्हणून मी फार दुःखी आहे,  परंतु एक भारतीय नागरिक आणि लष्करी कुटुंबातील एक भाग असल्याने मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. शहीद कर्नल बाबू काउंटरसइन्सपासून ते इतर पोस्टिंगपर्यंत फिल्ड जॉबमध्ये नेहमीच असत.

- Advertisement -

त्याचवेळी हुतात्मा कर्नलची आई मंजुला म्हणाली की माझी सून दिल्ली येथे राहते. त्यांनी मला दुपारी दोनच्या सुमारास फोन केला आणि सांगितले की संतोष बाबू आता नाहीत. संतोष बाबूंच्या हुतात्म्याचा मला अभिमान आहे,  कारण त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, जरी तो माझा एकुलता एक मुलगा असल्यामुळे मलाही वाईट वाटते.

भारत आणि चीनमधील लाईन ऑफ अॅक्चुअर कंट्रोल (एलएसी) येथे काल रात्रीपासून दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात तब्बल ४५ वर्षानंतर काल पहिल्यांदा भारत-चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – नोकरीची संधी! सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, त्वरीत अर्ज करा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -