भारतीय जवानांनी केलेले ‘हे’ कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

अरुणाचल प्रदेशमध्ये नियंत्रण रेषा पार केलेल्या आणि भरकटलेल्या जनावरांना भारतीय जवानांनी पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवले आहे.

indian army hands over 13 yaks 4 calves to china in humane gesture amid border dispute
भारतीय जवानांनी केलेले 'हे' कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

सध्या लडाखमधील नियंत्रण रेषेवरुन भारत आणि चिनी सैन्यांमध्ये तणाव सुरु आहे. मात्र, अशा परिस्थितही भारतीय लष्कराची माणुसकी दिसून आली आहे. भारतीय जवानांनी ३१ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये नियंत्रण रेषा पार केलेल्या आणि भरकटलेल्या जनावरांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवले आहे. भारतीय जवानांनी केलेले हे कृत्य पाहून सर्वांच भारतीय लष्कराचा अभिमान वाटला आहे.

ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार; ‘भारतीय लष्कराने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नियंत्रण रेषा पार करुन आलेल्या भरकटलेल्या १३ याक आणि चार वासरांना ७ सप्टेंबर रोजी चीनकडे परत सोपवले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी याबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत’.

महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी भारतीय आणि चिनी लष्कराचे जवान आमने-सामने आले होते. तर लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यांकडून हवेत गोळीबार करत भारतीय चौक्यांजवळ येण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे. चिनी सैन्यांनी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु असतानाच ही घटना घडली होती.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींची ‘सरकारी कंपनी बेचो’ मोहीम; राहुल गांधींचा घणाघात