घरदेश-विदेशमूल रडले म्हणून भारतीय प्रवाशांना विमानातून उतरवले

मूल रडले म्हणून भारतीय प्रवाशांना विमानातून उतरवले

Subscribe

विमान टेक ऑफ घेण्याआधी तो व्यवस्थित होता. पण टेक ऑफच्या वेळी तो रडू लागल्याने मुलाच्या आईने त्याला जवळ घेतले आणि शांत केले. एवढ्यात ब्रिटीश एअरवेजच्या क्रूमधील एक कर्मचारी बाहेर आला आणि तो त्या मुलाला पाहून ओरडू लागला.

विमान टेक ऑफ घेणार इतक्यात ३ वर्षांचा मुलगा रडला म्हणून विमानाच्या कॅबिन क्रूमधील एकाने लहानग्याला दरडावले. तो शांत झाला नाही. म्हणून चक्क विमान परत नेऊन त्या लहान मुलासकट कुटुंबाला विमानातून उतरवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार २३ जुलै रोजीब्रिटीश एअरवेजमध्ये घडला. इतकेच नाही तर विमानातील कर्मचाऱ्यांने विमानातील आणखी एका कुटुंबाला विमानातून उतरवले. त्यामुळे या संतप्त भारतीय प्रवाशांनी ब्रिटीश एअरवेज विरोधात वर्णभेदाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

लंडन सिटी एअरपोर्टवरुन ए. पी. पाठक त्यांची पत्नी आणि २ वर्षांचा मुलगा लंडनसाठी ब्रिटीश एअरवेजमधून निघाले होते. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा वेगळ्या सीटवर बसला होता. विमान टेक ऑफ घेण्याआधी तो व्यवस्थित होता. पण टेक ऑफच्या वेळी तो रडू लागल्याने मुलाच्या आईने त्याला जवळ घेतले आणि शांत केले. एवढ्यात ब्रिटीश एअरवेजच्या क्रूमधील एक कर्मचारी बाहेर आला आणि तो त्या मुलाला पाहून ओरडू लागला. टेक ऑफला अडथळा येऊ नये म्हणून पुन्हा आईने त्याला त्याच्या सीटवर बसवले आणि पण तो रडणे थांबवत नव्हता म्हणून मागच्या सीटवर बसलेल्या भारतीय कुटुंबापैकी एकाने त्याला बिस्कीट देऊ केले. पण तो शांत होत नव्हता. तेव्हा हा कर्मचारी पुन्हा बाहेर आला आणि त्याने ,’मुलगा शांत झाला नाही, तर विमानातून खाली फेकून देऊ, मुर्ख’, असे खेकसून म्हटले. त्यानंतर त्या कुटुंबाला आणि लहान मुलाला बिस्कीट देऊ इच्छिणाऱ्या दुसऱ्या भारतीय कुटुंबाला विमानातून उतरवण्यात आले. झालेली पूर्ण घटना त्यांनी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना एका पत्राद्वारे पाठवली.

- Advertisement -

ब्रिटीश एअरवेज करणार कारवाई?

ब्रिटीश एअरवेजकडे हे प्रकरण गेल्यानंतर हा सगळा प्रकार गंभीर असून आम्ही अधिक तपास करत आहोत. अशा प्रकारे कर्मचाऱ्याचे वागणे हे निंदनीय असून दोषी आढळल्यास शिक्षा करु असे देखील ब्रिटीश एअरवेजकडून सांगण्यात आले आहे. पण अद्यापही माफीचे कोणतेही पत्र पाठक कुटुंबियांना आले नाही, असे पाठक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -