घरदेश-विदेश१५ ऑक्टोबरपासून 'या' मार्गावर धावणार विशेष ट्रेन; असं असणार वेळापत्रक

१५ ऑक्टोबरपासून ‘या’ मार्गावर धावणार विशेष ट्रेन; असं असणार वेळापत्रक

Subscribe

काही गाड्या दररोज धावतील तर काही आठवड्यात धावणार

सणासुदीच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने 15 ऑक्टोबरपासून नवीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मुंबई सेंट्रल-इंदूर सुपरफास्ट अवंतिका एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-ओखा सुपरफास्ट सौराष्ट्र मेल आणि वांद्रे टर्मिनस-रामनगर सुपरफास्ट एक्सप्रेस 15 ऑक्टोबरपासून धावणार आहे. याशिवाय वांद्रे टर्मिनस-लखनऊ सुपरफास्ट एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस-भुज एसी एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-एच निजामुद्दीन युवा एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचा समावेश आहे.

ट्रेन क्र. 02961/02962 मुंबई सेंट्रल-इंदूर सुपरफास्ट स्पेशल अवंतिका एक्सप्रेस धावणार आहेत. ज्यामध्ये रेल्वे क्र. 02961 मुंबई मध्य-इंदूर विशेष ट्रेन 15 ऑक्टोबर, 2020 पासून 19.10 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी 09.15 वाजता इंदूरला पोहोचेल. तसेच रेल्वे क्र. 02962 इंदूर-मुंबई सेंट्रल विशेष ट्रेन इंदूर येथून 15 ऑक्टोबर, 2020 रोजी 16.15 वाजता सुटणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी 06.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. प्रवासादरम्यान ही ट्रेन बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी, सूरत, भरुच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, मेघनगर, थांदला रोड, बामनिया, रतलाम, खाचरोड, नागदा, उज्जैन आणि देवास स्थानकांवर थांबेल.

- Advertisement -

रेल्वे क्र. 09021/09022 वांद्रे टर्मिनस-लखनऊ सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस (साप्ताहिक) धावेल. तर रेल्वे क्र. 09021 वांद्रे टर्मिनस-लखनऊ विशेष ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून 17 ऑक्टोबर 2020 रोजी दर शनिवारी 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 19.15 वाजता लखनऊला पोहोचेल. तसेच रेल्वे क्र. 09022 लखनऊ-वांद्रे टर्मिनस विशेष गाडी 18 ऑक्टोबर 2020 पासून दर रविवारी लखनौहून 23.35 वाजता मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.

- Advertisement -

या विशेष गाड्यांच्या प्रवासासाठी तिकिट बुकिंग 12 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळ आणि मार्गांची माहिती दिली. रेल्वेनुसार मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेससह 15 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे.

काही गाड्या दररोज धावतील तर काही आठवड्यात धावणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दसरा, दिवाळी आणि छठ पूजा पाहता विशेष गाड्या मोठ्या प्रमाणात चालवल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -