घरताज्या घडामोडीब्रिटनच्या संसदेनं केल भारताच कौतुक; वाचा का केलं

ब्रिटनच्या संसदेनं केल भारताच कौतुक; वाचा का केलं

Subscribe

'भारत देशात मोठ्या संख्येने हिंदू धर्माचे लोक राहतात. मात्र, असे असून देखील भारतातील धार्मिक विविधता प्रशंसनीय आहे', असे कौतुक ब्रिटनच्या संसदेत करण्यात आले आहे.

‘भारत देशात मोठ्या संख्येने हिंदू धर्माचे लोक राहतात. मात्र, असे असून देखील भारतातील धार्मिक विविधता प्रशंसनीय आहे’, असे कौतुक ब्रिटनच्या संसदेत करण्यात आले आहे. संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान असं म्हटलं गेलं की, ‘भारत आंतरधर्मीय संवादांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे’, असे कौतुक ब्रिटनकडून करण्यात आले आहे.

ब्रिटनचे परराष्ट्र, राष्ट्रकुल व विकास कार्यालय (एफसीडीओ)चे मंत्री नाइजेल अ‍ॅडम्स म्हणाले की, ‘भारतात कठीण परिस्थितीतही मानवाधिकारांचे प्रश्न स्वतंत्रपणे उपस्थित केले जातात. भारतीय धर्मनिरपेक्ष घटनेत सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत. ते पुढे म्हणाले की, ‘ज्या लोकांना आपल्यासारख्या भारतात जाण्याची संधी मिळाली आहे, त्यांना हे ठाऊक आहे. हा एक अद्भुत देश आहे. हा जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देश’, असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.

- Advertisement -

भारत युकेसाठी महत्त्वपूर्ण आहे

अहवालानुसार, भारत ब्रिटनसाठी अपरिहार्य देश आहे. लवकरच तो जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. सध्याच्या दशकात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि संरक्षण बजेट असलेला देश होईल. युके आणि भारत या दोन देशांमध्ये मजबूत ऐतिहासिक संबंध आहेत. परंतु, वसाहतीच्या काळातल्या काही घटनांमुळे संबंधांमध्ये कटुता देखील निर्माण होऊ शकते. मात्र, असे असून देखील भारत ब्रिटनसाठी एक महत्त्वाचे स्थान राहील.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटेना, आता चर्चा समितीशी की सरकारशी?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -