घरदेश-विदेशसीमेलगतचे खोदकाम सोन्यासाठी नाही, चीनचा दावा

सीमेलगतचे खोदकाम सोन्यासाठी नाही, चीनचा दावा

Subscribe

सोन्याच्या शोधात चीनने अरुणाचल प्रदेशेच्या सीमेला लागूनच जोरदार खोदकामाला सुरुवात केली आहे. सोन्याच्या शोधात चीन हे खोदकाम करत आहे. या परिसरात मोठ्याप्रमाणात सोने, चांदीसह अनेक मौल्यवान वस्तूचा खजिना आहे. त्यामुळे या भागात चीनकडून खोदकाम सुरु असल्याचे वृत्त चीनच्या एका वृत्तपत्रात छापून आले होते. हे वृत्त खोटं असून या भागात सोन्याच्या शोधात खोदकाम सुरु असल्याच्या दाव्याला चीनने नाकारले आहे. या भागामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधासाठी सर्वेक्षण सुरु असल्याचे चीनने म्हटलं आहे.

चीन परराष्ट्र मंत्रालयाची माहिती –
चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितलं आहे की, रिपोर्टमध्ये ज्या क्षेत्रासंदर्भात बोलले जात आहे तो भाग चीनचा आहे. चीन याठिकाणी नियमितरित्या भूवैज्ञानिक शोध घेत असतो. त्यामुळे मीडियाकडे आलेल्या रिपोर्टद्वारे अफवा पसरवली जात असल्याचे चीनने म्हटलंय. चीन-भारत सीमेवर चीनची नरज साफ आहे. चीनने कधीही अरुणाचल प्रदेशला स्विकार केले नाही. बिजिंग आणि दिल्ली सीमा वादाला सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत आणि त्यामध्ये योग्य न्याय मिळेल अशी आशा असल्याचं लू कांग यांनी म्हटलंय.

- Advertisement -

‘साऊथ चायना मार्निंग पोस्ट’ने केलेला दावा –
हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीमध्ये हा दावा केला होता की, चीनने अरुणाचलप्रदेशच्या सीमेजवळ मोठ्याप्रमाणात खोदकाम सुरु केले आहे. या बातमीमध्ये चीनच्या सीमारेषेला लागून असलेल्या लुंझ काऊंटी या भागात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातुंचे विशाल भांडार आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात ६० अरब डॉलर म्हणजेच चार लाख कोटी रुपये किंमत आहे. त्यामुळे या भागात चीनने खोदकाम सुरु केले आहे. हे खोदकाम दिसत असले तरी या भागात चीनचा वर्चस्व निर्माण करण्याचा डाव आहे. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. खोदकामाच्या नावाखाली या भागात सैनिकांची जमवाजमव करुन डोकलामसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे या वृत्तपत्राने म्हटलंय.

चीन आणि भारत या दोन्ही देशामधील संबंध सुधारणेसाठी योग्य ते प्रयत्न सध्या सुरु होते. मात्र अरुणाचलप्रदेशच्या सीमेवरी चीनकडून सुरु असलेल्या खोदकामावरुनच चीन पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -