घरताज्या घडामोडीJEE Advanced परीक्षा ३ जुलैला, ७५ टक्क्यांची पात्रता रद्द   

JEE Advanced परीक्षा ३ जुलैला, ७५ टक्क्यांची पात्रता रद्द   

Subscribe

जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल.

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी केली. तसेच ही परीक्षा आयआयटी खरगपूर येथे होणार असल्याचे निशंक म्हणाले. जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल, अशीही माहिती निशंक यांनी वेबिनारच्या माध्यमातून दिली.

जेईई मेन्सच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केल्यानंतर जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा कधी आणि कुठे होणार? असा सवाल अनेक जण उपस्थित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचे संकट आहे आणि त्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल. प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी मिळेल, असे गुरुवारी झालेल्या वेबिनारमध्ये निशंक म्हणाले. जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेला फार महत्व आहे. यंदा ही परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी पार पडेल. त्यामुळे तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी बराच वेळ शिल्लक आहे, असेही निशंक यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -