जेट एअरवेजच्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार कमी

जेट एअरवेजच्या कॉस्टकटिंगमध्ये सीईओपासून मॅनेजरपर्यंत सर्वांच्या पगारात कपात करण्यात येणार आहे. महाग इंधन आणि कमी कमाई यामुळं कंपनीचा तोटा वाढीला लागला आहे.

Mumbai
jet-airways
प्रातिनिधिक फोटो

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीत कपात करण्यात येणार असून २५ टक्के पगार कपात होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. वर्षाकाठी २५ लाख रुपयांच पॅकेज असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच टक्के कपात होणार आहे. तर १ कोटीपेक्षा अधिक पॅकेज असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा २५ टक्के पगार कपात करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर, पायलटच्या पगारामध्ये १७ टक्के कपात होण्याची शक्यता आहे. या कॉस्टकटिंगमध्ये सीईओपासून मॅनेजरपर्यंत सर्वांच्या पगारात कपात करण्यात येणार आहे. महाग इंधन आणि कमी कमाई यामुळं कंपनीचा तोटा वाढीला लागला आहे. ऑपरेशनल कॉस्ट वाढण्यासाठी कॉस्टकटिंग करण्यात आल्याचं कारण सांगण्यात येत आहे. जेट एअरवेज पगारावर वर्षभरात साधारण ३००० कोटी रुपये खर्च करते. सदर कॉस्टकटिंगमधून कंपनीला् ५०० कोटी रुपयांचा फायदा होईल.

कधीपर्यंत पगार कपात?

जेट एअरवेजच्या सूत्रानुसार, पगार कपात साधारण कधीपर्यंत चालू राहणार याची कोणतीही मर्यादा आखण्यात आलेली नाही. कपात करण्यात आलेला पगार नंतर परत देण्यात येणार की नाही यासंदर्भातदेखील काहीही सांगण्यात आलेलं नाही. केवळ मॅनेजरच्या पदापासून ते सीईओच्या पदापर्यंत सर्वांच्याच पगारात कपात करण्यात येणार असल्याची माहिती असल्याचं सूत्रांकडून कळलं आहे.

५०० कोटी रुपयांची होणार बचत

एअरलाईनच्या टॉप मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्यांसह मीटिंग घेऊन पगार कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान पायलटच्या पगारात १७ टक्के कपात होणार आहे. या कपातीमुळं साधारण ५०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. जेट एअरवेजनं मागच्या वर्षीदेखील साधारण ३५० ज्युनिअर पायलटचा पगार आणि अन्य फायद्यांसाठी ३० टक्के कमी केली होती.

पायलट करू शकतात विरोध

पगारामध्ये कपातीसाठी पायलट विरोध करू शकतात. एअरलाईनच्या एका वरीष्ठ पायलटच्या म्हणण्यानुसार, पायलट याचा विरोध करणार आहेत. इतर एअरलाईन्समध्ये पायलटचे पगार वाढवत आहेत. मात्र असा पगार कपात झाल्यास, आम्ही दुसरी नोकरी स्वीकारू असं सांगण्यात आलं आहे.