घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत उपउपांत्यपूर्वफेरीत पराभूत

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत उपउपांत्यपूर्वफेरीत पराभूत

Subscribe

जगात ६ व्या क्रमांकावर असणाऱ्या भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात मलेशियाच्या डॅरेन लुईकडून पराभव पत्करावा लागला आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात मलेशियाच्या डॅरेनने पराभूत केले आहे. श्रीकांतने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनाला मात देत स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र आता श्रीकांतला उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात १८-२१ आणि १८-२१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव स्विकारावा लागला आहे.

असा झाला सामना

श्रीकांतला अवघ्या ३८ मिनीटांत डॅरेनने पराभूत करत विजय आपल्या नावे केला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच डॅरेनने सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिल्या सेटमध्ये श्रीकांतला १८-२१ च्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. मात्र त्यानंतरही श्रीकांतने आपला संघर्ष कायम ठेवला परंतु डॅरेनच्या अप्रतिम खेळापुढे श्रीकांतचा निभाव लागला नाही आणि दुसरा सेटही श्रीकांतच्या हातातून १८-२१ च्या फरकाने निसटला. अशाप्रकारे सरळ दोन सेट्समध्ये डॅरेनने श्रीकांतला पराभूत करत उपांत्यफेरी गाठली तर श्रीकांतसाठी मात्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

- Advertisement -

सायनाची उपांत्यफेरीत धडक

जगात ६ व्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीकांतला उपउपांत्यपूर्वफेरीत पराभव स्विकारावा लागला आहे. तर दुसरीकडे सायनाने सलग ८ व्या वेळेस उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे. सायनाने थायलंडच्या रॅटचानोकला २१-१६, २१-१९ च्या फरकाने पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे.

saina nehwal
सायना नेहवाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -