घरताज्या घडामोडीLive Update: पुण्यात करोनामुळे ३८ मृत्यू तर पिंपरीत ४१ मृत्यू

Live Update: पुण्यात करोनामुळे ३८ मृत्यू तर पिंपरीत ४१ मृत्यू

Subscribe

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन

सामाजिक मुद्द्यांवर नेहमी भाष्य करणाऱ्या स्वामी अग्निवेश निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती. लीव्हर सोरायसीस या आजारावर त्यांचे दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -


पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १९३८ रुग्ण आढळल्याने, १ लाख १५ हजार ७७० एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या १५७३ रुग्णांची तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९६ हजार ०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झाले आहेत.


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण


सुशांत ड्रग्ज प्रकरण; रिया, शोविकचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

बॉलिवूड अभिनेती रिया, शोविकचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. ती १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने रियाला अटक केली आहे. दरम्यान आता रिया, शोविकचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.


अजित पवार यांनी पुण्याच्या कोरोना परिस्थितीच्या घेतला आढावा

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेश कोरोना परिस्थितीबद्दल आढावा बैठक घेतली.


देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवस बिहार दौऱ्यावर

राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडवणीस आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर गेले आहेत. आगामी निवडणुकीपूर्वीचा त्याचा हा पहिला दौरा आहे.


देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, एकूण आकडा ४५ लाख पार!

देशात गेल्या २४ तासांत ९६ हजार ५५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार २०९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंजद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४५ लाख ६२ हजार ४१५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ७६ हजार २७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ९ लाख ४३ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राज्यात येत्या ३६ तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या ३६ तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे. तळकोकणात किनापट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला जात आहे.


देशात काल दिवसभरात ११ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या

देशभरात १० सप्टेंबरपर्यंत ५ कोटी ४० लाख ९७ हजार ९७५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ११ लाख ६३ हजार ५४२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


देशातील कोरोना रिकव्हरीमध्ये अभूतपूर्व वाढ!

देशातील कोरोना रिकव्हरीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात बरे झालेल्या आणि घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


जगात २४ तासांत ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, एकूण आकडा २ कोटी ८३ लाख पार!

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत जगभरात ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आणि ५ हजार ९२७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांचा आकडा २ कोटी ८३ लाखांहून अधिक असून यापैकी आतापर्यंत ९ लाख १३ हजारांहून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच आतापर्यंत २ कोटी ३ लाख ३८ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात २३,४४६ नव्या रुग्णांची नोंद; ४४८ बाधितांचा मृत्यू

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,००,७१५ रुग्ण बरे झाले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -