घरदेश-विदेशजोधपूरमधील इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली

जोधपूरमधील इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली

Subscribe

तीन जणांची सुटका करण्यात यश

राजस्थानमधील जोधपूर येथे आज दुपारी एक इमारत अचानक कोसळली आहे. जोधपूरच्या सरदारपुरा बी रोडवरील स्थित एक इमारत अचानक कोसळली असून तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र बरेच जण अजूनही ढिगाऱ्याली असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अजूनही लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोक या दुर्घटनेमुळे हादरून गेले असून इतर लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती सध्या मिळत आहे. सरदारपुरा बी रोडवरील काही लोकांनी ही बातमी या पडलेल्या इमारतींचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -