घरदेश-विदेशIPS अधिकाऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडल्यानंतर बायकोला झाली अमानुष मारहाण; अधिकारी निलंबित

IPS अधिकाऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडल्यानंतर बायकोला झाली अमानुष मारहाण; अधिकारी निलंबित

Subscribe

मध्य प्रदेशमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुरुषोत्तम शर्मा यांचा पत्नीला मारहाण करणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुरुषोत्तम शर्मा यांना विशेष नियुक्ती म्हणून मध्य प्रदेशमधली भोपाळमध्ये पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कायद्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या महासंचालकांचाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.

काय आहे प्रकरण

पुरुषोत्तम शर्मा यांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये शर्मा हे एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील महिलेला शर्मा बेदम मारहाण करताना जमिनीवर आपटतात आणि नंतर बुक्के मारतानाही दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती शर्मा यांची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये शर्मा या महिलेला मारहाण करतानाच शिवीगाळही करत आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ पकडल्यानंतर या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. घरी आल्यानंतरही या दोघांमधील वाद अगदी शिगेला पोहोचला. त्यामुळेच संतापलेल्या शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणामध्ये आता शर्मा यांचा मुलगा पार्थ शर्मा यानेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पित्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पार्थने हा व्हिडिओ पाठवला आहे. पार्थ स्वत: एक आयआरएस अधिकारी आहे. या प्रकरणामध्ये शर्मा यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

 हेही वाचा –

पायल घोष वि. अनुराग कश्यप वादात आता रामदास आठवलेंची उडी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -