घरदेश-विदेशमलेशिय सरकार लहान मुलांसाठी घेणार 'हा' महत्वाचा निर्णय

मलेशिय सरकार लहान मुलांसाठी घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

Subscribe

१७ वर्षा खालील मुलांना मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंग पासून लांब ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न.

इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वाढता वापर आणि गेमिंग अॅडिक्शन लहान मुलांमध्ये वाढत आहे. स्मार्टफोन आल्यापासून हल्ली प्रत्येक लहान मुलाकडे मोबाईल फोन उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवर गेम खेळने किंवा अधिकाधिक वेळ सोशल मीडियावर घालवण्याचे प्रमाण दिवसें दिवस वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची टक्केवारी मोठी आहे. या कारणामुळे मुलांना मानसिक आजार होत असल्याच्या घटनाही घडल्या. लहान मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्याचे आता मलेशियन सरकार विचार करत आहे. यासाठी १७ वर्षाहून लहान मुलांच्या मोबाईलवर इंटरनेट सुविधा बंद करण्यात येणार आहे. मध्यरात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत फोनमधील इंटरनेट बंद राहिल. मलेशियात अधिकतर मुले रात्रीचा वेळ मोबाईलमध्ये गेम खेळण्यात घालवतात असे एका सर्वेक्षणातून समोर आले. सरकारच्या या निर्णयामुळे लहानमुलांना रात्री मिळणारा वेळेत ते झोपू शकतील.

का बनवण्यात आला नियम?

मेलशियात मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांचे अॅडिक्शन वाढत आहे. ३४.९ टक्के अल्पवयीन मुले हे इंटरनेट अ‍ॅडिक्ट झाली आहेत. हा एक मोठा टक्का मानला जातो आहे. या टक्केवारीत १४ ते १७ वर्षांदरम्यान मुलांचे प्रमाण अधिक आहे. ही माहिती उप-आरोग्यमंत्री डॉ. ली बून सईई यांनी संसदेत सादर केली. यावर बंदीघालण्याचा निर्णयलवकरच संसदेत घेण्यात येईल असे ही ते म्हणाले. मलेशियातील ८० टक्के नागरिक इंटरनेटचा वापर करतात. २४ दशलक्ष नागरिक सोशल मीडियाचावापर अॅक्टिव्ह आहेत.

सोशल मीडिया आणि गेमिंग साईट्सचे अॅडिक्शन समाजावर नकारात्मक परिणाम करत आहे. जागतिक आरोग्य संस्था(डब्ल्यूटीओ) द्वारे देण्यात आलेल्या अहवालानुसार इंटरनेटचा अतिवापर आणि गेमिंग अॅडिक्शन मानसिक आजारांचे कारण बनत आहे. याकडे अधिक गंभिर लक्ष देणे आवश्यक आहे. – उप-आरोग्यमंत्री डॉ. ली बून सईई

- Advertisement -

या देशांमध्येही इंटरनेटवर बंदी

जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी ही मोबाईलवरील इंटरनेटवर बंदी घातली आहे. मलेशियन सरकारही अशाच प्रकारची बंदी आणून इंटरने आणि ऑनलाईन गेमिंगचे अॅडिक्शन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनेट वर बंदी घालण्या व्यतिरीक्त सईई यांनी गेमिंग कंपन्यांनाही दिवसातील एक ते दोन तास गेमिंग साईट बंद ठेवण्याचे आवाहन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -