घरदेश-विदेशमनमोहन सिंग, रघुराम राजन यांचा कार्यकाळ बँकांसाठी सर्वात वाईट

मनमोहन सिंग, रघुराम राजन यांचा कार्यकाळ बँकांसाठी सर्वात वाईट

Subscribe

अर्थमंत्री सीतारामन यांची मुक्ताफळे

सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय बँकांसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन या दोघांचा कार्यकाळ हा सर्वाधिक वाईट काळ होता, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बहुसंख्य निधर्मवाद्यांनी मान्यता दिलेल्या भारताच्या सर्वाधिक लोकशाहीवादी नेतृत्वाने भ्रष्टाचाराची दुर्गंधी मागे ठेवली, ती आम्ही अजूनही साफ करतोय, असेही त्या म्हणाल्या. येथील प्रतिष्ठित कोलंबिया विद्यापीठात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात सीतारामन बोलत होत्या.

सीतारामन म्हणाल्या की, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जीवनदान देणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. मी रघुराम राजन यांचा एक विद्वान म्हणून आदर करते. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर उंचीवर होता तेव्हा राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तेव्हा राजकीय नेत्यांच्या एका फोन कॉलवर कर्ज दिली जायची आणि त्यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका अजूनही सरकारकडून मिळणार्‍या मदत निधीवर अवलंबून आहेत. त्यातून त्या सावरलेल्या नाहीत.

- Advertisement -

डॉ. सिंग हे त्यावेळी पंतप्रधान होते आणि माझी खात्री आहे की डॉ. राजन हेही मान्य करतील की डॉ. सिंग यांचा भारताबाबतचा दृष्टीकोन सातत्याने स्पष्ट होता, असे सीतारामन यांनी सांगताच एकच हशा पिकला. त्यावेळी सीतारामन म्हणाल्या की, मी या दोघांचाही सन्मान करते. मी कोणाचीही मस्करी करत नाही. पण ज्या प्रकारे वक्तव्य करण्यात आले त्याला मी उत्तर देत आहे. राजन यांनी केलेल्या वक्तव्यामागील त्यांच्या भावनांबद्दल मला शंका घेण्याचे कारण नाही. आणि मी येथे त्यांना मान देण्यासाठी उभी आहे. पण मी वस्तुस्थिती मांडत आहे. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सिंग, राजन याचा कार्यकाळ खूपच वाईट होता. पण त्यावेळी आम्हाला ते कळले नाही.

राजन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पुनर्आढावा घेतला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण लोकांना कळले पाहिजे की बँकांची आज अशी स्थिती का झाली? हा वारसा आला कुठून? हेही समजले पाहिजे, असे सीतारामन म्हणाल्या. या कार्यक्रमाला नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती आणि भारताचे न्यूयॉर्कमधील राजदूत संदीप चक्रवर्ती उपस्थित होते. अर्थतज्ज्ञ भूतकाळ आणि वर्तमानकाळातील परिस्थितीचा आढावा घेऊन उत्तर शोधतात; पण राजन जेव्हा गव्हर्नर पदावर होते, भारतीय बँकांबद्दल बोलत होते, त्या बँकांना जीवनदान देणे हे भारतीय अर्थमंत्र्यांचे प्राथमिक कर्तव्य झाले आहे आणि अशी आणीबाणीची परिस्थिती एका रात्री येत नाही, असे सीतारामन म्हणाल्या.

- Advertisement -

भारतात व्यक्तीकेंद्रीय नेतृत्व आहे अशी कोणाची भावना असेल तर मला सांगावेसे वाटते की, सर्व भ्रष्टाचार संपवणारे लोकशाही नेतृत्व भारतात आहे. पंतप्रधान हा कुठल्याही मंत्रिमंडळात समान दुआ असतो. विविधतेने नटलेल्या भारतात प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. पण कथित लोकशाहीवादी नेतृत्व ज्याला बहुसंख्य निधर्मवाद्यांनी मान्यता दिली, त्यांनी देशात भ्रष्टाचाराची इतकी दुर्गंधी मागे ठेवली की आम्ही ती अजूनही साफ करतोय, असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -