घरदेश-विदेशनिमंत्रण रद्द करणे, ही एक लाजिरवाणी बाब - नयनतारा सहगल

निमंत्रण रद्द करणे, ही एक लाजिरवाणी बाब – नयनतारा सहगल

Subscribe

नयनतारा यांनी त्यांचे भाषण आयोकांना पाठवले होते. त्यानंतर अचानक त्यांना ईमेल आला की, त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, याविषयी बोलताना नयनतारा म्हणाल्या की, ही एक लाजिरवाणी बाब आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे निमंत्रण इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना देण्यात आले होते. परंतु, आयोजकांनी अचानक त्यांचे निमंत्रण रद्द केले आहे. त्यांना निमंत्रण दिल्यानंतर आयोजकांनी त्यांच्याकडून भाषणाची प्रत मागीतली होती. नयनतारा यांनी त्यांचे भाषण आयोकांना पाठवले होते. त्यानंतर अचानक त्यांना ईमेल आला की, त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, याविषयी बोलताना नयनतारा म्हणाल्या की, ही एक लाजिरवाणी बाब आहे.

‘भाजपच्या मुख्यमंत्र्यांना भाषण नसेल आवडलं’

नयनतारा देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणार होत्या. ते देशातील असहिष्णू आणि हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होत्या, असे नयनतारा ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटल्या आहेत. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, माझं भाषण मी आोजकांना पाठवले होते. त्यांनी त्याचा अनुवाद केला होता. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री येणार आहेत, याची मला कल्पना नव्हती. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना माझं भाषण आवडलं नसेल, असे नयनतारा म्हणाल्या.

- Advertisement -

कोण आहेत नयनतारा सहगल?

नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाची आहेत. त्या एक मोठ्या इंग्रजी लेखिका आहेत. त्यांच्या ‘रिच लाईक अस’ या पुस्तकासाठी त्यांना १९८६ साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. परंतु, दिल्ली जवळील एका गावात गोमांस खाल्याच्या संशयावरुन हिंदू तरुणांकडून मोहम्मद अखलाल नावाच्या मुस्लीम समाजाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या नयनतारा यांनी पुरस्कार परत केला होते.

‘या’ गोष्टीवर भाष्य करणार होत्या नयनतारा

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनवेळी नयनतारा देशात सुरु असलेल्या वास्तवावर बोलणार होत्या. त्या बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन उफाळलेल्या दंगलीवर बोलणार होत्या. त्याचबरोबर देशातील राजकारणावर बोलणार होत्या. नयनतारा म्हणाल्या की, हा देश फक्त हिंदूचा आहे, असं काहींना वाटते. पण हा हिंदुस्तान प्रत्येकाचा आहे. गेल्या काही काळापासून अनेक विचारवंत आणि लेखकांची हत्या झाली. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. गोमांस संशयावरुन दंगल घडवली जात आहे. निष्पाप लोकांचे जीव घेतली जात आहे. या हल्लेखोरांना सत्ताधाऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे नयनतारा म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -