घरदेश-विदेशदिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी! तापमान पोहोचले १.१ अंश सेल्सिअसवर

दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी! तापमान पोहोचले १.१ अंश सेल्सिअसवर

Subscribe

दिल्लीत असणाऱ्या यंदाच्या थंडीने गेल्या कित्येक वर्षाचा मोडला विक्रम

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीला हुडहुडी भरली आहे. सध्या दिल्लीत असणाऱ्या थंडीमुळे दिल्लीत थंडीची चादर पसरल्याचे दिसतेय. दिल्लीत असणाऱ्या यंदाच्या थंडीने गेल्या कित्येक वर्षाचा विक्रम मोडला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सफदरजंग वेधशाळेमध्ये किमान तापमान १.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

- Advertisement -

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते, जानेवारी १९३५ मध्ये तापमान सर्वात कमी -०.६ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी सकाळी ६ वाजता दृश्यमानता शून्य असल्याचे भारतीय हवामान खात्याचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले. पालम आणि सफदरजंग भागातील दृश्यता सकाळी १० वाजता वाढली, परंतु २०० मीटरच्या खाली त्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय.

काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने एक अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली होती. दिल्लीत जानेवारी महिन्यात गेल्या ८ वर्षातील किमान तापमान पाहिल्यास यंदाचे तापमान १.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर २०१२ मध्ये ४.४, २०१३ मध्ये १.९, २०१४ मध्ये ४.४, २०१५ मध्ये ४, २०१६ मध्ये ४.२, २०१७ मध्ये ३.२, २०१८ मध्ये ४.२, २०१९ मध्ये आणि २०२० मध्ये २.४ तर २०२१ मध्ये आतापर्यंत १.१ अंश सेल्सिअस असे सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत २०२१ या नव वर्षाची पहिली सकाळ दाट धुक्यात झाली. सकाळपासूनच दिल्ली-एनसीआरच्या भागात धुकेची चादर पसरली होती.


उद्या कोरोना लसीकरणाचं राज्यात होणार ड्राय रन; ‘या’ चार जिल्ह्यांची निवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -