घरदेश-विदेशभजनात रंगले मून-जे- इन

भजनात रंगले मून-जे- इन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून- जे- इन यांच्या हस्ते सॅमसंगच्या नव्या प्लॅँटते उद्घाटन होणार असून यापूर्वी राजघाट येथील गांधी स्मृती या ठिकाणी मून- जे- इन यांनी महात्मा गांधीना अभिवादन केले

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन सध्या भारत भेटीवर आहेत. त्याचे कारणही विशेष आहे. नोएडामध्ये आज सॅमसंगच्या नव्या फॅक्टरीचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून- जे- इन यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून त्या पूर्वी राजघाट येथील गांधी स्मृती या ठिकाणी मून- जे- इन यांनी महात्मा गांधीना अभिवादन केले आणि महात्मा गांधी यांच्या भजनात ते तल्लीन झाले. मून यांचा हा पहिलात भारत दौरा असून त्यांच्यासोबत पत्नी जुंग-सुक देखील आलया आहेत.

 

- Advertisement -

नोएडात सॅमसंगचा नवा प्लांट

नोएडाच्या सेक्टर ८१ मध्ये सॅमसंगचा हा नवा प्लांट असून ३५ एकर जागेवर तो पसरला आहे. सध्या सॅमसंगच्या मोबाईल फोनची क्षमता वर्षाला ६.८ कोटी इतकी आहे. आता या विस्तारानंतर ती १२ कोटीच्या घरात जाईल असे म्हटले जात आहे. या उद्घाटन सोहळ्याला १०० हून अधिक व्यावसायिक येणार आहेत.

मेट्रोने केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी नोएडा पर्यंतचा मेट्रो प्रवास केला. यावेळी लोकांनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करतानाचा हा व्हिडिओ

- Advertisement -


दक्षिण कोरियाकडून देशाला फायदाच

दक्षिण कोरिया भारताचा सगळ्यात मोठा भागीदार असून गेल्यावर्षी १ कोटी ३६ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता. मागील १० वर्षांमध्ये ४७ हजार कोटींची गुंतवणूक कोरियाने भारतात केली. येत्या काळात हा आकडा २ कोटी ५० लाखांच्या घरात पोहोचणार असल्याचे म्हटले जात आहे. ज्याचा भारताला आर्थिक फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -