घरCORONA UPDATECoronaVirus: तबलीगी जमातच्या कार्यक्रमावर भडकली खासदार नुसरत

CoronaVirus: तबलीगी जमातच्या कार्यक्रमावर भडकली खासदार नुसरत

Subscribe

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनी दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाबाबत आपले मत मांडताना घडलेल्या प्रकारावर टीका करत संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाबाबत खासदार नुसरत जहाँ यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनी या प्रकरणावर आपले मत मांडताना घडलेल्या प्रकारावर टीका करत संताप व्यक्त केला आहे. तसेच या कसोटीच्या काळात अशा प्रकारचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नयेत, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

हेही वाचा – बाळंतीणसाठी खास सुविधा; ‘या’ हेल्पलाईनवर करा फोन

- Advertisement -

काय म्हणाल्या नुसरत जहाँ

मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आता आपण सारे कठिण परिस्थितीचा सामना करत आहोत. अशावेळी आपण धार्मिक, राजकिय किंवा जातीपातीच्या गप्पा-गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. बाहेर भटकून अफवा पसरवण्यापेक्षा आपल्या घरात सुरक्षित राहण्यातच सर्वांचे हित आहे. आपण सगळ्यांनी अशा कठिण प्रसंगी सावध राहायला हवे. कोणताही व्हायरस धर्म पाहून हल्ला करत नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरी तुम्ही कोरोनाचा धोका लक्षात घ्यायलाच हवा, असे त्यांनी नमूद केले.

त्या नागरिकांना शोधण्याचे काम सुरू 

दरम्यान, दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांना आता क्वारंटाईन करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. प्रशासन त्या नागरिकांनापर्यंत पोहचले असून प्रत्येकाचा शोध घेत आहेत. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. सर्व धर्माच्या प्रमुख गुरू आणि धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल, असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे. या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -