घरदेश-विदेशकमलनाथ यांच्यानंतर भाजपाच्या मंत्र्याची काँग्रेस नेत्याच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी

कमलनाथ यांच्यानंतर भाजपाच्या मंत्र्याची काँग्रेस नेत्याच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी

Subscribe

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठामंत्री बिसाहूलाल सिंह यांनी अनूपपुर येथील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ सिंह यांच्या पत्नी बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. मंत्री बिसाहूलाल सिंह यांनी, विधानसभा निवडणुकीचा जेव्हा फॉर्म भरल्या जातो तेव्हा संपूर्ण संपत्तीचे विवरण दिले जाते. सर्व माहिती दिली जाते. मात्र विश्वनाथ सिंह यांनी त्यांची पहिली पत्नी व जी सद्यस्थितीस आहे, याबद्दल माहिती दिली नाही. त्यांनी हे सांगितले नाही की माझी एक पत्नी आहे ती विवाहीत आहे. त्यांच्याकडून माहिती घ्या की तुमची पहिली पत्नी कुठं आहे. हे देखील सांगा की माझी दुसरी पत्नी आहे, तर दोन पत्नी आहेत, असे वक्तव्य करत खळबळ माजवली आहे.

बिसाहूलाल यांच्याविरोधात मानहानीचा दावा

त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने म्हटले आहे की, काल कमलनाथ यांच्या एका शब्दाला पकडून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मौन बाळगले. आता ते काय करतील? आता शिवराज सिंह यांनी बिसाहूलाल यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. तर, काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ सिंह यांनी म्हटले की, बिसाहूलाल निवडणूक हरत आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. ती माझी धर्मपत्नी आहे. मी त्यांच्याशी विवाह केला आहे आणि माझी दोन मुले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की मी १५ वर्षे अगोदर त्यांच्याशी विवाह केला होता. मी बिसाहूलाल यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

नितीश कुमार चोर है…; मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -