Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग माझं नाव '२६ जानेवारी', लाख प्रयत्नानंतरही नाव बदललं नाहीचं

माझं नाव ‘२६ जानेवारी’, लाख प्रयत्नानंतरही नाव बदललं नाहीचं

२६ जानेवारी यांचे वडिल शिक्षक होते मात्र ते कट्टर देशभक्तही होते. २६ जानेवारीच्या मुहूर्तांवर मुलगा जन्मल्याने त्याने त्यांनी मुलाचे नाव २६ जानेवारी ठेवले.

Related Story

- Advertisement -

देशाचा प्रजासत्ताक दिवस हा सर्वांना माहिती आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी ही तारिख लहान मुलांपासून सर्वांनाच माहिती असते. २६ जानेवारी ही तारिख आहे. मात्र जर कोणी माझे नाव २६ जानेवारी आहे सांगतले तर. धक्का बसेल ना. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर येत आहे. इथे एका माणसाचे नावचं चक्क २६ जानेवारी टेलर असे आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्याच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थानमध्ये काम करणाऱ्या एका माणसाचे २६ जानेवारी असे आहे. त्यांचे असे विचित्र नाव ऐकून सर्वांनाच हसायला येते. २६जानेवारी १९६६ साली त्यांचा जन्म झाला. २६ जानेवारी यांचे वडिल शिक्षक होते मात्र ते कट्टर देशभक्तही होते. २६ जानेवारीच्या मुहूर्तांवर मुलगा जन्मल्याने त्याने त्यांनी मुलाचे नाव २६ जानेवारी ठेवले.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी त्यांचा ५५वा वाढदिवस साजरा करणार आहेत. २६ जानेवारी सांगतात, ‘माझ्या या नावामुळे माझी बऱ्याचदा खिल्ली उडवली जायची. मला माझ्या नावामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांच्या सर्व सरकारी कागदपत्रांवर त्यांचे नाव २६ जानेवारी असेच लिहिले आहे. माझ्या नावामुळे बॅंकेत खाते उघडतानाही मला खूप त्रास झाला. मात्र वडिलांनी मला दिलेल्या नावाचा मी पूर्णपणे सन्मान ठेवून त्या नावासोबतच मी आयुष्य जगले आणि जगतो आहे,असे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात नावामुले त्यांना अनेक त्रासांना समोरे जावे लागले होते. मात्र हळू हळू माझे काम आणि व्यवहार लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आवडू लागलो. आता संपूर्ण ऑफिसमध्ये  संपूर्ण स्टाफ मोठ्या गर्वाने २६ जानेवारी अशा नावाने हाक मारतात’, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

२६ जानेवारी यांच्या आई वडिलांनी त्यांच्या ठेवलेल्या नावाचा आम्ही आदर करतो. देशभक्त असलेल्या आई वडिलांना त्यांच्या मुलाचे २६ जानेवारी असे ठेवले याचा आम्हाला आदर आहे,असे मंदसौर डाइटचे प्रभारी प्राचार्य प्रदीप पंजाबी यांनी सांगितले आहे. दरवर्षी जिल्हा कलेक्टरही २६ जानेवारी यांची भेट घेतात. सर्वात प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्यानंतर ऑफिसचा सर्व स्टाफ २६ जानेवारी यांचा वाढदिवसही साजरा करतात. यंदा २६ जानेवरी त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करणार आहेत.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; ४० लाखांहून अधिक युजर्सचं प्री-रजिस्ट्रेशन

- Advertisement -

 

 

- Advertisement -