घरदेश-विदेशCorona: क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाच्या दंशाने चिमुरडीचा झाला मृत्यू!

Corona: क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाच्या दंशाने चिमुरडीचा झाला मृत्यू!

Subscribe

बेतालघाट जिल्ह्यातील ४ वर्षीय अंजना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिल्लीहून वडिलांसह सुखरुप गावी पोहोचली होती

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून धडपड सुरू आहे. परदेशातून किंवा इतर कोणत्याही राज्यातून प्रवास करून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक विचित्र प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. असे असताना उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ४ वर्षांच्या मुलीला सापाने दंश केला आणि तिने आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. बेतालघाट जिल्ह्यातील ४ वर्षीय अंजना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिल्लीहून वडिलांसह सुखरुप गावी पोहोचली होती.

दरम्यान, दिल्लीहून परत आल्यानंतर या मुलीला गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. मुलीला या क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाने दंश केला. याची माहिती मिळताच तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

वडिलांसह दिल्लीहून परतली होती चिमुरडी

तल्लीसेटी खौला गावातील तोकमध्ये राहणारे महेंद्र सिंह यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते मात्र लॉकडाऊनमुळे ते तेथे अडकले होते. लॉकडाऊन शिथिल होताच त्यांनी आपल्या गावी पोहोचण्याचा निर्णय घेतला. गावातील लोकांनी कोरोनाच्या भीतीने त्यांना एका शाळेत क्वारंटाईन केले.

सोमवारी सकाळी चार वर्षांची अंजना शाळेतील क्वारंटाईन कक्षात होती आणि तिचे आई-वडील बाहेर होते. आत आल्यानंतर त्यांनी मुली जवळ एक साप बसलेला पाहिला. त्यांनी त्या सापापासून मुलीची सुटका केली. यानंतर मुलीच्या शरीरावर सापाने दंश केल्याचे निशाण पाहून कुटुंबियांनी तातडीने अंजनाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिला वाचविण्यात यश आले नाही.


क्वारंटाईन सेंटरमध्ये तरूणांची गांजा पार्टी; व्हिडीओ व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -