Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Smoking करणाऱ्या वाघाला पाहून नेटकऱ्यांना ठस्का, पहा व्हिडिओ

Smoking करणाऱ्या वाघाला पाहून नेटकऱ्यांना ठस्का, पहा व्हिडिओ

एका ट्रकमधून हा वाघ बाहेर येऊन चक्क तोंडातून धूर सोडताना पाहून नेटकरीही चकित झाले आहेत. वाघ पण आता सिगरेट प्यायला लागला आहे, असे नेटकरी म्हणत आहेत.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातच आता एका वाघाचा व्हिडिओ व्हायरल होत. यात वाघ चक्क सिगरेट ओढताना दिसत आहे. सिगरेट ओढून धुर सोडतानाचा वाघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मध्यप्रदेशच्या बंधवगड येथील जंगलातील हा व्हिडिओ आहे. एका ट्रकमधून हा वाघ बाहेर येऊन चक्क तोंडातून धूर सोडताना पाहून नेटकरीही चकित झाले आहेत. वाघ पण आता सिगरेट प्यायला लागला आहे, असे नेटकरी म्हणत आहेत.

- Advertisement -

स्मोकिंग करणाऱ्या वाघाला पाहून नेटकरीही गोंधळात पडले आहेत. वाघ कसा काय स्मोकिंग करतो असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या व्हिडिओमध्ये एका ट्रकमधून वाघ बाहेर पडताना दिसत आहे. ट्रकमध्ये बसलेला वाघ अचानक बाहेर येतो आणि काही क्षणातच त्यांच्या तोंडातून धुर यायला सुरूवता होते. बांधवगड नॅशनल पार्कमध्ये १५ जानेवारीला हा वाघ एका विहिरीत पडलेला सापडल्याचे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एक रेस्क्यू ऑपरेशन करुन त्या वाघाला बाहेर काढण्यात आले सल्याचेही तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र वाघाच्या तोंडातून धुर कसा काय आला?, वाघ स्मोकिंग करतो यावर मात्र नेटकऱ्यांचा विश्वास बसत नाही. काही दिवसांपूर्वी एका स्मोकिंग करणाऱ्या हत्तीचा व्हिडिओही अशाप्रकारे व्हायरल झाला होता. कर्नाटकमधील एक हत्ती स्मोकिंग करतो असा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कर्नाटकमधील नागराहोले नॅशनल पार्कमधील हत्तीचा हा व्हिडिओ होता. आता स्मोकिंग करणाऱ्या वाघाचा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच चक्रावून गेले आहे. खरंतर मध्यप्रदेशातील थंडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता. थंडिमुळे ज्याप्रमाणे माणसांच्या तोंडातून वाफा येतात. त्याचप्रमाणे वाघाच्याही तोंडातून वाफा येत होत्या.


- Advertisement -

हेही वाचा – Amazon वरून मागवलेल्या पदार्थाला केक समजून पठ्ठ्यानं खाल्लं शेणं!

- Advertisement -