घरदेश-विदेशहीच का मानवता?

हीच का मानवता?

Subscribe

अमृतसर येथे ट्रेनच्या शौचालयात अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अर्भकाच्या गाळ्याभोवती ओढणी अडकवली असल्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळाला जन्म देऊन मारणाऱ्या प्रवृत्तीला माणूसकी म्हणायची का?

बाळाला जन्म देणे ही प्रत्येक आई साठी एक आनंदाची गोष्ट असते. नऊ महिने गर्भात ठेवून एक महिला बाळाला जन्म देते. मात्र नको असलेल्या बाळांना जन्म देऊन त्यांना मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्याला माणूस म्हणायचे का? जगात ठिकठिकाणी चमत्कार होतात. असाच एक चमत्कार अमृतसरमध्ये बघायला मिळाला आहे. हावडा एक्सप्रेस गाडीचे शौचालय साफ करताना एक अर्भक सफाई कर्मचाऱ्याला सापडले. शौचालयाच्या भांड्यात हे अर्भक फेकण्यात आले होते.  या अर्भकाच्या गळ्यात ओढणी गुंडाळली होती. या घटनेनंतर या अर्भकाला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. सध्या अर्भक डॉक्टरांच्या दक्षतेखाली आहे.

रडल्यावर बाळ जीवंत असल्याचे समजले

या घटनेबद्दल सांगतांना रेल्वे कर्मचारी सफीने सांगितले आहे की,”रेल्वे यार्डात गाड्या सफाई कामासााठी येतात. दुपारी अडीचच्या सुमारास मला एक फोन आला. रेल्वे शैचालयातील भांड्यात एक मृत अर्भक असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्याने दिली. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारवर आम्ही एसी कम्पार्टमेंटच्या D-३ डब्यात गेलो. या अर्भकाला शौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आले होते. त्याच्या गळ्या भोवती असलेल्या ओढणीला खेचून त्याला बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यावर हे बाळ रडू लागल्याने ते जीवंत असल्याचे आम्हाला समजले. रेल्वे पोलिसांना याची माहिती देऊन आम्ही अर्भकाला अमृतसर नागरी रुग्णालयात दाखल केले. ”

- Advertisement -

“ज्यावेळी अर्भकाला रुग्णालयात आणले त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती. त्याची आंघोळ घालण्यात आली. बाळाला थंडी वाजत असल्याने त्याला बेबी व्हार्मर ठेवण्यात आले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. चार डॉक्टरांची टीम या बाळाची काळजी घेत आहे. हे बाळ एक दिवसाचे आहे.” – डॉ. संदीप, अमृतसर नागरी रुग्णालयात 

“हावडा एक्सप्रेस सकाळी साडे दहा वाजता अमृतसर स्टेशनला पोहोचली होती. यानंतर ती साफ सफाईसाठी यार्डमध्ये नेण्यात आली होती. चार तास हे बाळ शौचालयाच्या भांड्यात राहूनही जीवंत राहणे म्हणजे एक चमत्कारच आहे. या प्रकरणी ३१७ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.” – अमृतसर जीआरपीचे स्टेशन हाउस ऑफिसर (एसएचओ), बलबीर सिंह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -