जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी अंद्राबीचे घर सील; एनआयएची कारवाई

जम्मू - काश्मीरमधील फुटिरतावादी महिला नेता आणि दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबी हीचे श्रीनगर येथील घर सील करण्यात आले आहे. एनआयएने धडक कारवाई करण्यात आली आहे.

Jammu kashmir
nia attaches residence of kashmiri separatist leader asiya andrabi as per provisions of the uapa
जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी अंद्राबीचे घर सील

जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी महिला नेता आणि दुख्तरानमिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबी हीचे श्रीनगर येथील घर सील करण्यात आले आहे. टेरर फंडिंगप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता अंद्राबी आपले घर विकू शकत नसून त्याचा व्यावसायिक कारणांसाठी देखील वापर करु शकत नाही. दरम्यान, अंद्राबी सध्या कोठडीत असून जर तिची सुटका झाली तर ती आपल्या घरात राहू शकते.

अंद्राबी दिली कबूली

अंद्राबी सध्या एनआयएच्या कोठडीत असून तिची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान तिने कबूली दिली आहे. या कबूली दरम्यान तिने सांगितले आहे की, पाकिस्तानातून तिला काश्मीर खोऱ्यात आपल्या दुख्तरान – ए – मिल्लत या संघटनेकडून महिलांचे आंदोलन घडवून आणण्यासाठी पैसा मिळत होता. तसेच मुंबई स्फोटाचा सुत्रधार हाफिज सईद यांच्या आदेशानुसार काश्मीर खोऱ्यात भारतीय जवानांवर दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक घडवून आणल्याचा आरोपही अंद्राबीवर करण्यात आला आहे. काश्मीर विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेली अंद्राबी चार वर्षांपूर्वी पाकिस्तानी झेंडा फडकवणे आणि पाकिस्तानी राष्ट्रगीत गायल्यामुळे चर्चेत देखील आली होती.