घरदेश-विदेशनिर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप? पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप? पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी

Subscribe

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप यावर आज निर्णय होणार आहे. आरोपींनी फाशीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केल्याने न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

१६ डिसेंबर २०१२! संपूर्ण देश हादरून गेला तो दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेने. चालत्या बसमध्ये मेडिकल विद्यार्थीनीवर ६ नराधमांनी अमानुषपणे बलात्कार केला. १६ दिवशाच्या झुंजीनंतर निर्भयाने अखेरचा श्वास घेतला. न्यायासाठी देशभर मोर्चे निघाले. लोक रस्त्यावर उतरले. निर्भयाला न्याय तर मिळाला, पण नराधमांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे काय?. आज सर्वोच्च न्यायालयात निर्भयाच्या नराधमांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप यावर आज फैसला होणार आहे. संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश दिपक मिश्रा, न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायधीश अशोक भूषण आज काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निर्भयाच्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, नराधम मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी फाशीविरोधात अपील केल्याने त्यावर आज निर्णय होणार आहे.

काय आहे निर्भया प्रकरण

१६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मेडिकल विद्यार्थीवनीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. यावेळी तिचा मित्र देखील तिच्या सोबत होता. त्याला देखील जबर मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेनंतर देश हादरला. याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली. तर, उर्वरित ५ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर, बस ड्रायव्हर राम सिंग याने कोठडीतच स्वत:ला संपवले. मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या ३ नराधमांनी फाशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तर, अक्षय कुमार सिंग याने अद्यापही दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेले नाही. त्यामुळे ३ नराधमांच्या अपीलावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -