घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटहवेतून पसरणाऱ्या कोरोनाच्या 'एअरबोर्न'चा बंदोबस्त करणार 'एअर फिल्टर'

हवेतून पसरणाऱ्या कोरोनाच्या ‘एअरबोर्न’चा बंदोबस्त करणार ‘एअर फिल्टर’

Subscribe

दोन दिवसांपूर्वीच काही शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा प्रसार हवेतून होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ला दिला होता. त्यानंतर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत होती. कारण आतापर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिन्स्टस, मास्क, सॅनिटायझर अशा पर्यायाचा स्वीकार केला गेला होता. हवेच्या माध्यमातून विषाणूंचा प्रसार झाल्यास ते कोणत्याही देशाला परवडणारे नाही. मात्र यावर देखील आता समाधान शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हवेतील विषाणू रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक एअर फिल्टरचा शोध लावला आहे.

कोरोना विषाणूचे संकट दूर करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मटेरियल्स टुडे फिजिक्स या नियतकालिकात या एअर फिल्टर विषयी माहिती देण्यात आली आहे. या एअर फिल्टरमधून जाणारी हवा ही ९९.८ टक्के इतक्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फडशा पाडते, असे या संशोधनात म्हटले आहे. तसेच हे उपकरण व्यावसायिकदृष्टीने वापरता येईल या हेतून तयार करण्यात आले आहे. उपकरणातील निकेल फोमला २०० अंश सेल्सियसपर्यंतच्या उष्णेत तायर करण्यात आले आहे. ही बातमी हिदुस्तान टाइम्स या वेबसाईटने प्रकाशित केलेली आहे.

- Advertisement -

हे एअर फिल्टर विमानतळ, विमान, कार्यालये, शाळा-महाविद्यालये, क्रूझ अशा बंद ठिकाणी वापरता येऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकप्रकारे मदतच होऊ शकते, असा दावा हॉस्टन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि या संशोधनाचे सहलेख झिफेंग रेन यांनी केला आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाचा विषाणू हा हवेत तीन तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. हे फिल्टर विषाणूला पकडून त्याचा खात्मा करु शकते, त्यामुळे या उपकरणाला जगभरातून प्रतिसाद मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विविध संशोधनाद्वारे अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनाचा विषाणू हा ७० अशं सेल्सियसच्या वातावरणात जिवंत राहत नाही. हे उपकरण त्यापेक्षाही जास्त म्हणजेच २०० अंश सेल्सियस पर्यंतचे तापमान निर्माण करते. त्यामुळे विषाणूला मारण्यामध्ये हे उपकरण यशस्वी होऊ शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -