घरदेश-विदेशPUB G ने घेतला तिघांचा जीव

PUB G ने घेतला तिघांचा जीव

Subscribe

पोलिसांनी चौकशीसाठी सूरजला ताब्यात घेतल्यानंतर त्याला ऑनलाईन खेळाचे वेड लागले होते.त्याचे पालक त्याला सतत यावरुन बोलत होते. याचा राग त्याच्या डोक्यात होताच.

ऑनलाईन गेम्सनी अनेकांना वेड लावले आहे. आता ऑनलाईन गेममधील PUB G या खेळाचे वेड सगळीकडे पाहायला मिळत आहे. या खेळाच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने चक्क आपल्या आपल्या कुटुंबाला संपवले आहे. दिल्लीतील वसंतकुंजमधील किसनगड परीसरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे मारेकरी हा १९ वर्षांचा आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील वसंतकुंजमध्ये वर्मा कुटुंब राहते. या कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. घरातील प्रमुख मिथिलेश, आई सिया आणि बहिण यांचा यात समावेश होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना घरातील सामान विखुरलेले दिसले. प्रथमदर्शनी चोरीच्या हेतूने खून झाल्याचे पोलिसांना वाटले. पण अधिक तपासानंतर हा प्रकार वेगळा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कुटुंबातील १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली. अधिक चौकशीनंतर जे सत्य समोर आले. त्याने त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला.

- Advertisement -

खूनाची दिली कबुली

पोलिसांनी चौकशीसाठी सूरजला ताब्यात घेतल्यानंतर त्याला ऑनलाईन खेळाचे वेड लागले होते.त्याचे पालक त्याला सतत यावरुन बोलत होते. याचा राग त्याच्या डोक्यात होताच. हे कळले. शिवाय १५ ऑगस्टला त्यांनी त्याला भर चौकात काही कारणास्तव मारले होते. त्याचा रागही होता. त्याला खेळता यावे यासाठी त्याने वेगळी खोली देखील भा्ड्याने घेतली होती. चौकशीसाठी सूरजला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण त्याने खूनाची कबुली दिल्यानंतर सगळा प्रकार समोर आला.

 थंड डोक्याने केले खून 

बुधवारी त्याचे घरात काही खटके उडाले. त्यामुळे त्याने वडील आणि त्यानंतर आईचा चाकू भोसकून मारुन टाकले. बहिण नेहा ही कोणत्यातरी मुलासोबत बोलते हा रागही त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने बहिणीचा गळा चिरला. ती तडफडताना त्याला पाहावले गेले नाही. म्हणून त्याने तिच्या पोटात चार-पाच वेळा चाकू खुपसून मारुन टाकले. त्यानंर आरोप स्वत:वर येऊ नये म्हणून त्याने चोरी झाल्याचा बनाव रचला. विशेष म्हणजे सावधान  इंडिया पाहून त्याला ही कल्पना सुचल्याचे देखील त्याने सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -