घरदेश-विदेशभारतीय लष्कराचे ५० जवान 'हनी ट्रॅपिंग'च्या जाळ्यात

भारतीय लष्कराचे ५० जवान ‘हनी ट्रॅपिंग’च्या जाळ्यात

Subscribe

भारतीय लष्करासंबंधित संवेदनशील माहिती मिळावी, यासाठी आता पाकिस्तान हनी ट्रॅपिंगचा वापर करत आहे. पाकिस्तानच्या या हनी ट्रॅपिंगच्या जाळ्यात भारतीय लष्कराचे ५० जवान अडकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भारतीय लष्कराच्या सुरक्षा यंत्रणांनी आणि पोलिसांनी भारतीय लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे.

आयएसआय ही दहशतवादी संघटना भारतामध्ये दहशतवाद निर्माण करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवित आहे. यातील सध्याची वापरली जाणारी पद्धत म्हणजे ‘हनी ट्रॅपिंग’. गेल्या महिन्यातच पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील जवानांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी ‘हनी ट्रॅपिंग’ या पद्धतीचा वापर करत असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक देखील केली होती. परंतु, तरीदेखील ‘हनी ट्रॅपिंग’ सुरु असल्याचे उघड झाले आहे. आता तर या दहशतवादी संघटनांनी भारतीय लष्करातील ५० जवानांना या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले आहे. याप्रकरणी भारतीय लष्कराने एका जवानाला अटक केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! युवकांसोबत होत आहे ‘हनी ट्रॅपिंग’

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

फेसबुकवर अनिका चोप्रा नावाचे एक अकाउंट आहे. तिने ९ जानेवारी २०१८ ला भारतीय लष्करात कामासाठी रुजू झाल्याची माहिती टाकली आहे. ही महिला भारतीय लष्करातील जवानांना आपल्या जाळ्यात ओढून लष्कराची संवेदनशील माहिती काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. ही महिला जवानांना आपण भारतीय लष्करातील नर्स असल्याचे सांगत असे. त्याचबरोबर ती व्हिडिओ कॉल करुन जवानांपुढे अश्लील नृत्य देखील करत असे. आतापर्यंत ५० जवानांना तिने तिच्या जाळ्यात अडकवले आहे. हे जवान मिलिट्री इंटेलिजन्सच्या रडारवर आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानच्या जैसलमेरमधून सोनबीर सिंह या जवानाला अटक केली आहे. शिवाय, अनिका चोप्राच्या फ्रेंडलिस्टमधील ५० जवान हे मिलिट्री इंटेलिजन्सच्या रडारवर आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिका चोप्रा ही आयएसआय या दहशतवादी संघटनेची महिला एजंट आहे.

हेही वाचा – हनी ट्रॅपमध्ये अडकला जगदीश, इस्लामसाठी सोडला देश

- Advertisement -

भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती लीक?

सोनबीर सिंह हा जैसलमेरमधील आर्म्ड-ब्रिगेडमध्ये अर्जुन बॅटल टॅंकवर तैनात होता. तो बऱ्याच दिवसांपासून अनिका चोप्रा या फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता. त्याने भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनबीरने भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती, फोटो, व्हिडिओ अनिकाला पाठवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ४ जानेवारीला राजस्थानच्या जैसलमर लष्करी तळावरुन त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो राजस्थान पोलिसांच्या कोठडीत आहे. शिवाय, अनिकाच्या फ्रेंडलिस्टमधील ५० जवान मिलिट्री इंटेलिजन्सच्या रडारवर आहेत.

हेही वाचा – हनी ट्रॅप लावून आरोपीला केले अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -