घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना प्रादुर्भावाचा घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना प्रादुर्भावाचा घेतला आढावा

Subscribe

या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, एनआयटीआय सदस्य, कॅबिनेट सचिव आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. यावेळेस देशातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

- Advertisement -

या बैठकीत काय चर्चा झाली?

सध्या देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाखांहून अधिक झाला आहे. अशा परिस्थितीत काय करता येईल? लॉकडाऊनचं काय, अनलॉकचं काय? चाचण्या वाढवणं किती गरजेचं आहे? या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

देशात मागील चार दिवसांत एक लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत सर्वाधिक २७ हजार ११४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख २० हजार ९१६वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार १२३ झाला आहे. तसंच आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने मागील विक्रम पुन्हा एकदा मोडला आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचं संकट आणखी गडद होताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना कायमचा जाण्याची शक्यता कमीच – WHO


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -