घरक्रीडाक्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट

क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट

Subscribe

नदालचं अकरावं फ्रेंच ओपन विजेतेपद

स्पेनमधील फ्रेंच ओपन पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमला हरवत जेतेपद पटकावले आहे. एखादा कप जिंकण्यापेक्षा तो आपल्याकडे सलामत ठेवण्यात जास्त मेहनत लागते. अशीच मेहनत दाखवत सलग ११व्यांदा ही स्पर्धा जिंकत राफेलने आपण जगज्जेता असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. २००५ ते २००८ या वर्षांत राफेलने सलग स्पर्धा जिंकल्या आहेत. यानंतर २०१० ते २०१४ आणि आता २०१७ आणि २०१८ मध्ये स्पर्धा जिंकत तब्बल ११ वेळा राफेलने ही स्पर्धा जिंकली आहे.

अंतिम सामना चुरशीचा

राफेल नदाल आणि ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम यांच्यातील अंतिम सामन्यात राफेलने डॉमनिकला तीन सेट मध्ये हरवत विजय मिळवला. चढाओढीचा झालेला हा सामना २ तास ४२ मिनिटे चालला. या सामन्यात राफेलने ६-४, ६-३, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात थिएमला एकही सेट जिंकता आला नाही.

- Advertisement -

राफेल नदालच जगज्जेता

टेनिस जगतातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा राफेलने जिंकल्या आहेत. राफेलने फ्रेंच ओपन स्पर्धा अकराव्यांदा जिंकत मार्गारेट कोर्ट याच्या अकरा विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. नदाल याचे कारकिर्दीतील हे सतरावे विजेतेपद आहे. त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेत तीन वेळा, विम्बल्डनमध्ये दोन वेळा व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकदा जेतेपद पटकावले आहे. ऑलिम्पिकमध्येही नदालने एकदा सुवर्णपदक जिंकले आहे.

RAFAEL NADAL
राफेल नदाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -