घरदेश-विदेशराजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवाराचा मृत्यू

राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवाराचा मृत्यू

Subscribe

निवडणुक प्रचारा दरम्यान लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्यामुळे आता या विधनासभा मतदारसंघातील निवडणुक स्थगित होण्याची शक्यता आहे. जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रिपोर्ट मागवला आहे.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. मात्र या निवडणुकीआधीच अलवर जिल्ह्यातील रामगढचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने लक्ष्मण सिंह यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.

- Advertisement -

हार्ट अटॅकने झाले निधन

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान विधानसभा निवडणुकीमुळे राज्यभर सगळीकडे जोरदार प्रचार सुरु आहे. सर्व उमेदवार मतदार संघात फिरून प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यादरम्यान बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्याची घटना घडली आहे. अलवर जिल्ह्यातील रामगडचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे.

निवडणुक स्थगित होण्याची शक्यता

बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे गुरुवार सकाळी निधन झाले. निवडणुक प्रचारा दरम्यान लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्यामुळे आता या विधनासभा मतदारसंघातील निवडणुक स्थगित होऊ शकते. जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रिपोर्ट मागवला आहे. हा रिपोर्ट निवडणुक आयोगाला पाठवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -