घरदेश-विदेशप. बंगालमधल्या RSSच्या 'त्या' कार्यकर्त्याची हत्या शेजाऱ्यानंच केली!

प. बंगालमधल्या RSSच्या ‘त्या’ कार्यकर्त्याची हत्या शेजाऱ्यानंच केली!

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या झालेल्या हत्येचं कोडं अखेर उलगडलं असून त्यांच्याच शेजाऱ्यानं पैशांच्या वादातून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आठवड्याभरापूर्वी पश्चिम बंगालमध्ये बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांचा लहानगा मुलगा या तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बंगालमध्ये मोठा गदारोळ झाला होता. हत्या झालेली व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य असल्यामुळे या हत्येला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. त्यासोबतच पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर देखील भाजपकडून आरोप करण्यात आले. मात्र, अखेर ही हत्या पाल यांच्या शेजारी राहणाऱ्या २० वर्षांच्या व्यक्तीनेच केल्याची बाब आता पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे भाजप आणि स्थानिक आरएसएसकडून केल्या जात असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

८ ऑक्टोबरला बंधू प्रकाश पाल यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जियागंज परिसरामध्ये पाल सहकुटुंब राहात होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य देखील होते, असा दावा लगेच आरएसएसने केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या मुद्द्यावरून लागलीच निषेध करणारं ट्वीट त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून केलं. त्यामध्ये या हत्याकांडावर पुरोगाम्यांनी काहीही म्हटलं नाही असं सांगत निषेध करण्यात आला होता. या प्रकरणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारवर राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून टीका देखील करण्यात आली होती.

- Advertisement -

दुधवाल्यामुळे सापडला आरोपी!

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या दूधावाल्याच्या वर्णनावरून संशयिताचं चित्र बनवलं होतं. याच दूधवाल्याने बंधू प्रकाश पाल यांच्या घरातून त्यांच्या २० वर्षांच्या शेजाऱ्याला पळून जाताना पाहिलं होतं. या चित्राच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. एका विम्याच्या रकमेवरून असलेल्या अंतर्गत वादातून त्याने बंधू प्रकाश पाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -